Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhishek Sharma चा रौद्रावतार, गोलंदाजांना धू धू धुतले; अवघ्या 91 चेंडूत ठोकल्या 233 धावा, Video Viral

Abhishek Sharma slams 233 in Punjab inter-district match: अभिषेक शर्माने एका आंतर- जिल्हा स्पर्धेतील एकदिवसीय सामन्यात तुफान फटकेबाजी करत २३३ धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 02, 2026 | 08:04 PM
Abhishek Sharma चा रौद्रावतार, गोलंदाजांना धू धू धुतले; अवघ्या 91 चेंडूत ठोकल्या 233 धावा, Video Viral
Follow Us
Follow Us:
  • Abhishek Sharma चा रौद्रावतार
  • गोलंदाजांना धू धू धुतले
  • अवघ्या 91 चेंडूत ठोकल्या 233 धावा
भारतीय संघाचा युवा आणि स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माने एका स्थानिक जिल्हा एकदिवसीय सामन्यात वादळी फलंदाजीने खळबळ उडवून दिली. पंजाब आंतर-जिल्हा वरिष्ठ एकदिवसीय स्पर्धेत अभिषेकने चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. अभिषेकने तुफान फटकेबाजी करत अवघ्या ९१ चेंडूंमध्ये २३३ धावा ठोकल्या. यामध्ये ५ चौकार आणि २५ षटकार मारले. या सामन्यात त्याने द्विशतक झळकावले. या खेळीच्या जोरावर अमृतसर संघाने ५० षटकांत ८ विकेट्स गमावून ५३३ धावा केल्या. त्याच्या वादळी खेळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉक्सिंग रिंगमध्ये भारताच्या ‘गोल्डन बॉईज’चे वादळ! सचिन सिवाच-अंकुश पंघालची CWG 2026 मध्ये सुवर्ण कामगिरी

अभिषेक शर्माची वादळी खेळी

झिम्बाब्वे दौऱ्यावर अपेक्षेप्रमाणे कामगिरी न केल्यामुळे भारताचा सलामीवीर अभिषेकला टीकेला सामोरे जावे लागले. या मालिकेत अभिषेकला केवळ १, ८ आणि २ धावा करता आल्या होत्या. पण आता, भारतात परतल्यानंतर अभिषेकने एकदिवसीय जिल्हा सामन्यात आपला फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. पंजाब राज्य आंतर-जिल्हा वरिष्ठ एकदिवसीय मर्यादित षटकांच्या स्पर्धेत अभिषेक शर्मा अमृतसर वरिष्ठ संघाकडून खेळत होता. या २५ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या २३३ धावांच्या खेळीत १५ चौकार आणि २५ षटकार ठोकले. त्याचा स्ट्राइक रेट २५६.०४ होता.

ABHISHEK SHARMA MAKES A STATEMENT 🔥 – He smashed 233 runs from just 91 balls with 15 fours & 25 sixes against Tarn Taran Men Sr in the One Day District match pic.twitter.com/QV4k83Oo5e — Johns. (@CricCrazyJohns) August 2, 2026

अभय चौधरीसोबत ३०० हून अधिक धावांची भागीदारी

अभिषेकने डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आणि अभय चौधरीसोबत ३०५ धावांची मोठी सलामीची भागीदारी रचली. अभयनेही उत्कृष्ट फलंदाजी करत ८५ चेंडूंमध्ये ९३ धावा केल्या. २५ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अभिषेक आशिष लॉरेन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला, पण तोपर्यंत त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या आशा जवळजवळ संपुष्टात आणल्या होत्या.

त्याच्या ऐतिहासिक खेळीमुळे अमृतसर सिनियर्स संघाने ५० षटकांत ८ विकेट्स गमावून ५३३ धावांचा डोंगर उभा केला. या संघात सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक-फलंदाज सलील अरोरा याचाही समावेश होता, ज्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १८ चेंडूंमध्ये २९ धावांचे योगदान दिले.

भारतीय संघाची पुढची टी-२० आंतरराष्ट्रीय स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा आहे. स्थानिक स्पर्धेतील अभिषेकच्या प्रभावी खेळीमुळे, आगामी स्पर्धेत अभिषेकची कामगिरी कशी असेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.

गोल्डन गर्ल्सचा दमदार पंच! CWG 2026 मध्ये प्रिया घंघास आणि साक्षी चौधरीने जिंकले सुवर्णपदक

Web Title: Abhishek sharma 233 runs 91 balls 25 sixes punjab inter district odi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 08:04 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Abhishek Sharma Century
  • Punjab

संबंधित बातम्या

IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप
1

IND vs AFG: अभिषेक शर्माने उघडले सेलिब्रेशनचे रहस्य, पिचवर केला ‘ॐ नमः शिवाय’ चा जप

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज
2

IND Vs AFG: संजू अन् अभिषेकच्या वादळी खेळीत अफगणिस्तान गार; विजयासाठी 222 रन्सची गरज

IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक
3

IND Vs AFG: अफगणिस्तानचा सुपडासाफ! Abhishek Sharma ने बेकार रडवलं, ठोकले खणखणीत शतक

Abhishek Sharma ने केलंयं मार्केट जाम! अफगाणिस्तानविरुद्ध वादळी खेळी अन् ICC रॅंकिंग्समध्ये मोठी झेप
4

Abhishek Sharma ने केलंयं मार्केट जाम! अफगाणिस्तानविरुद्ध वादळी खेळी अन् ICC रॅंकिंग्समध्ये मोठी झेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.