
abhishek sharma 77 runs
शेर ए पंजाब टी 20 लीगमध्ये अभिषेक शर्माने वादळी खेळी करत सर्वांना चकित करून सोडले आहे. या लीगची सुरुवात अत्यंत शानदार पद्धतीने झाली. भारताचा आक्रमक फलंदाज असलेल्या अभिषेक शर्माने धमाकेदार खेळी करत अमृतसर सूरमाझ संघाने 258 रन्सचा भलामोठा डोंगर उभा केला होता. मात्र त्याची खेळी ही व्यर्थ गेल्याचे पाहायला मिळाले.
अभिषेक शर्माच्या स्फोटक खेळीच्या जोरावर अमृतसर सूरमाझ 20 ओव्हर्समध्ये तब्बल 258 रन्सचा डोंगर उभा केला. मात्र मोहाली किंग्जच्या फलंदाजांनी हे आव्हान सहज मोडीत काढले. मोहाली किंग्जने 3 विकेट्सच्या बदल्यात केवळ 19.3 ओव्हर्समध्ये हे टार्गेट पूर्ण केले आहे. तसेच अमृतसर सूरमाझ सनसनाटी विजय प्राप्त केला.
IND Vs AFG: पठाणांचा गेम होणार! लवकरच Team India ची घोषणा होणार, मात्र ‘या’ खेळाडूला संधी नाहीच?
अमृतसर सूरमाझ संघाला अभिषेक शर्माने शानदार सुरुवात करून दिली. ल त्याने केवळ 17 बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. 26 बॉलमध्ये त्याने 6 सिक्स आणि 7 फोर मारत 77 रन्सची तुफानी खेळी केली आहे. त्याला सहज धवनने 18 बॉलमध्ये 45 रन्स तर नमन धीरने 47 रन्सची आक्रमक खेळी केली आहे. या धावसंख्येच्या जोरावार अमृतसर सूरमाझने 258 रन्सचा बलाढ्य डोंगर उभा केला.
पहिला टी-२०: १३ सप्टेंबर
दुसरा टी-२०: १५ सप्टेंबर
तिसरा टी-२०: १७ सप्टेंबर
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला क्रिकेटर व्हायचंय की एंटरटेनर? अर्जुन रणतुंगाने दाखवला आरसा
आगामी आशियाई खेळ २०२६ च्या तयारीच्या दृष्टिकोनातून भारतीय संघासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या सिरिजमधून अभिषेक शर्माला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. झिम्बाब्वेविरुद्ध तो अपयशी ठरला होता. तो खराब फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले होते. इंग्लंडविरुद्ध देखील त्याला आपली छाप पाडता आली नव्हती.