
ind vs sl test
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना ड्रॉ झाला आहे. मात्र सिरिज भारतीय संघाने जिंकली आहे. त्यातच आता हा सामना ड्रॉ झाल्याने भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये देखील नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या भारत या पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावरच राहण्याची शक्यता आहे. मात्र या सामन्यात श्रीलंकेने भारताला चांगले रडवले असल्याचे पाहायला मिळाले.
श्रीलंकेच्या तळातील फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना रडकुंडीस आणल्याचे पाहायला मिळाले . शुभमन गिलचे बचावात्मक नेतृत्व आणि पावसाचा व्यत्यय यामुळे देखील भारताने जिंकता येणारा सामना गमावला. भारतीय संघाने ही सिरिज 1-0 ने जिंकली आहे.
IND Vs SL: गूल, गूल दांडी गूल! Sonal Dinusha पडला टीम इंडियाला भारी, बॉलर्स रडकुंडीला
या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने पहिल्या डावात 503 रन्स केल्या. त्यानंतर श्रीलंकेचा संघ 290 रन्सवर ऑल आउट झाला. त्यामुळे भारतीय संघाने श्रीलंकेला फॉलोऑन दिला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र तिथूनच भारताचा हा सामना जिंकण्याचा हेतू साध्य झाला नाही.
शेवटच्या दिवशी भारतीय संघाला श्रीलंकेला ऑल आउट करण्यात अपयश आले. शेवटच्या 2 विकेट्स घेण्यासाठी भारताला मोठा संघर्ष करावा लागला. सोनल दीनुशा आणि केशारा नुवांथाची जोडी भारतीय संघासाठी अत्यंत धोकादायक आणि संयमाची परीक्षा घेणारी ठरली. चौथ्या दिवशी श्रीलंकेने केवळ 16 रन्सची आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या दिवशी श्रीलंकेने 200 रन्स पेक्षा जास्त आघाडी घेतली आणि भारतीय संघाला फलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही.
श्रीलंकेने फॉलोऑन मिळाल्यावर चांगली भागीदारी केली. शेवटच्या 2 विकेट्ससाठी श्रीलंकेने भारतीय संघाला अक्षरश: रडवले. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलने देखील गोलंदाजी केल्याचे सामन्यात दिसून आले.