
suryakumar yadav
भारतीय संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने कर्णधार पदावरून हटवल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. टी 20 वर्ल्ड जिंकून दिल्यावर बीसीसीआयने त्याचे पद काढून घेतले आणि श्रेयस अय्यरला टी 20 संघाचा नवीन कर्णधार म्हणून नेमले आहे. दरम्यान अचानक झालेल्या निर्णयावर सूर्यकुमार यादवने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राडा होणार पण BCCI नाही ऐकणार! Team India मध्ये येण्यासाठी Suryakumar Yadav ला करावे लागेल ‘हे’ काम
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने सातत्याने चांगले प्रदर्शन केले होते. त्याच्या नेतृत्वात भारताने एकही टी 20 सिरिज गमावली नव्हती. तसेच घरच्या मैदानावर टी 20 वर्ल्डकप देखील भारताला जिंकून दिला. त्यानंतर देखील निवड समितीने श्रेयस अय्यरला टी 20 चे कर्णधारपद सोपवले. माझ्यासाठी हा निर्णय सोपा नव्हता असे सूर्यकुमार यादव म्हटले.
🚨 Suryakumar Yadav statement on dropped from the team after winning the T20 World Cup 26 🚨 “The one he chose, I played a lot of cricket with Shreyas, he is a good player, good human being & good captain also”. “So I don’t think, why did you make this ? I was a little… pic.twitter.com/f7p1Kck3Dt — Vikas (@Vikas662005) August 29, 2026
सूर्यकुमार यादवने एका कार्यक्रमात माजी फलंदाज आकाश चोप्राशी बोलताना सांगितले, ‘मला जेव्हा संघातून वगळले असल्याची बातमी कळली, तेव्हा मी शांत होतो. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही तेव्हा मी हसून स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत राहतो. भारतीय संघाचे भविष्य लक्ष्य घेऊन निवड समितीने हा निर्णय घेतला असावा. 2026 मध्ये मला पुढील दोन वर्ष संघाचे नेतृत्व करेन असे मला विश्वास होता. ऑलम्पिक आणि पुढील टी 20 वर्ल्ड सारख्या मोठ्या स्पर्धा समोर होत्या. मात्र माझे आणि निवड समितीचे विचार वेगळे असू शकतात, असे सूर्यकुमार यादव म्हणाला.
वाद पेटवला पण Suryakumar Yadav च्या ‘त्या’ पोस्टने सगळे चित्र स्पष्ट; म्हणाला, ‘मला भारतीय…’