अभिषेक शर्मा तोडणार दोन मोठे रेकॉर्ड्स (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
याशिवाय एकाच वर्षात भारतासाठी टी२० आंतरराष्ट्रीय खेळात सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू सूर्यकुमार यादवचा रेकॉर्डही अभिषेक तोडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. यासाठी त्याला ४० धावांची आवश्यकता आहे. आज सर्व चाहत्यांचे लक्ष अभिषेकच्या या रेकॉर्डकडे लागून राहील.
भारतासाठी एका वर्षात सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम सध्या सूर्यकुमार यादव (SKY) यांच्या नावावर आहे. त्यांनी २०२२ मध्ये ३१ सामन्यांमध्ये ११६४ धावा जमवल्या होत्या. स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा आता हा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आहे. २०२६ मध्ये ३७ टी-२० सामन्यांमध्ये ११२५ धावा करणाऱ्या अभिषेकला, सूर्यकुमार यादव यांचा विक्रम मोडण्यासाठी ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात फक्त ४० धावांची गरज आहे. या सामन्यात ४० धावा करताच तो सूर्यकुमार यादव यांचा विक्रम मोडेल.
अभिषेक शर्मा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात एक धमाकेदार खेळी केली. त्या सामन्यात त्याने ३८ चेंडूंमध्ये २९७.३७ च्या स्ट्राईक रेटने ९ चौकार आणि ११ षटकारांसह ११३ धावा केल्या होत्या. वैभव सूर्यवंशीनेही १९ चेंडूंमध्ये ४५ धावांची वेगवान खेळी केली होती. त्यामुळे, अभिषेक आजच्या सामन्यातही हाच फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
ऑकलंडमध्ये होणारा भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा चौथा टी-२० सामना अभिषेक शर्मासाठी खूप खास असणार आहे. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल की तो या सामन्यात ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांचे मोठे विक्रम मोडू शकतो की नाही. २६ वर्षीय अभिषेकने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७० सामन्यांमध्ये ४ शतके आणि १४ अर्धशतकांसह एकूण २२४० धावा केल्या आहेत.
IND Vs NZ: उद्या नुसता राडा! केवळ 35 रन्स अन् Abhishek Sharma ‘हा’ महारेकॉर्ड करणार
Ans: एका वर्षात T20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड सूर्यकुमार यादवच्या नावे आहे
Ans: सूर्यकुमारचा रेकॉर्ड तोडण्यासाठी केवळ ४० धावांची गरज अभिषेक शर्माला आहे
Ans: आजचा सामना ऑकलंड येथील ईडन पार्क येथे होणार आहे






