Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ : कीवींचा सुपडा साफ करण्यासाठी भारताचा मास्टरप्लॅन! वैभव सूर्यवंशीला डच्चू अन् ईशान किशनचे कमबॅक? कशी असेल Playing 11

Ind vs Nz 4th T20 probable playing 11: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी20 सामना ३० ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात कशी असेल भारताची सभाव्य प्लेइंग ११, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 29, 2026 | 03:37 PM
Ind vs Nz 4th T20 probable playing 11

Ind vs Nz 4th T20 probable playing 11

Follow Us
Follow Us:
  • किवींचा ५-०ने गेम ओव्हर करण्याची संधी
  • वैभव सूर्यवंशीला विश्रांती मिळणार?
  • ईशान किशनच्या पुनरागमनाकडे लक्ष
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 आंतरराष्ट्रीय मालिका आतापर्यंत खूपच रोमांचक ठरली आहे. दोन्ही संघामध्ये आतापर्यंत ३ सामने खेळले गेले. या तिन्ही सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. या मालिकेत टीम इंडिया ३-० ने आघाडीवर असून मालिका खिशात घातली आहे. आता, किवींना त्यांच्याच घरच्या मैदानाव र५-० ने पराभूत करणे हे भारताचे ध्येय असेल. आता, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथा टी-२० सामना खेळला जाणार आहे. हा सामना ऑकलंडमध्ये खेळला जाईल. या सामन्यात, टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये कोणाला संधी मिळणार, जाणून घ्या.

कोण आहे उमा काशवी? WPL Auction मध्ये रचला इतिहास; 15 वर्षांच्या खेळाडूवर दिल्ली कॅपिटल्सचा विश्वास

चौथ्या सामन्यात कोणाला मिळणार संधी?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना ३० ऑक्टोबर रोजी ईडन पार्कवर होणार आहे. ईशान किशनने सराव सुरू केला असून तो आता संघात पुनरागमन करू शकतो. तो भारतीय संघाचा एक महत्त्वाचा फलंदाज असून तंदुरुस्त होताच अंतिम ११ खेळाडूंमध्ये परत येईल. जेव्हा किशन दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० सामन्यांमधून बाहेर झाला, तेव्हा भारताचा राखीव सलामीवीर वैभव सूर्यवंशीला त्याच्या जागी खेळण्याची संधी देण्यात आली होती. वैभवने तिसऱ्या टी-२० सामन्यात ४५ धावांची शानदार खेळी केली होती. असे असूनही, आता किशन त्याच्या जागी संघात परत येऊ शकतो.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत नितीश कुमार रेड्डीने चांगली कामगिरी केली. मात्र, त्याला दुखापती होण्याची शक्यता जास्त असल्याने त्याच्या कामाच्या ताणावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. संघ व्यवस्थापनाची इच्छा असेल की नितीश एकदिवसीय मालिकेसाठी तयार असावा. त्यामुळे, त्याला चौथ्या टी-२० सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी शिवम दुबेला संधी मिळू शकते. तर अक्षर पटेललाही एका सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. सध्या राखीव खेळाडू म्हणून बाकावर असलेल्या कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांची त्याच्या जागी निवड केली जाऊ शकते.

अर्शदीप सिंगही नियमितपणे क्रिकेट खेळत आहे आणि संघ व्यवस्थापनाला त्याला एकदिवसीय मालिकेसाठी मैदानात उतरवण्याच्या तयारीत असेल. त्यामुळे, त्याला एका सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी मयंक यादवला अंतिम ११ खेळाडूंमध्ये खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना ऑकलंडमधील ईडन पार्क येथे खेळला जाईल. हा सामना ३० ऑक्टोबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:३० वाजता सुरू होईल. चाहते हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि सोनी लिव्ह ॲपद्वारे पाहू शकतात.

टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग ११: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, श्रेयस अय्यर (क), तिलक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, भुवनेश्वर कुमार, प्रिन्स यादव, कुलदीप यादव, मयंक यादव.

ICC T20 रँकिंगमध्ये मोठा उलटफेर! Abhishek Sharma ने ईशान किशनला पछाडलं; बनला जगातील नंबर 1 फलंदाज

Web Title: Ind vs nz 4th t20 probable playing 11 vaibhav sooryavanshi ishan kishan pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Ishan Kishan
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND Vs NZ: अजेय, अभेद्य भारताचे वाघ! न्यूझीलंडला फोडणार घाम; ऑकलंडमध्ये कसा आहे रेकॉर्ड?
1

IND Vs NZ: अजेय, अभेद्य भारताचे वाघ! न्यूझीलंडला फोडणार घाम; ऑकलंडमध्ये कसा आहे रेकॉर्ड?

IND vs NZ: T20 सिरीजमध्ये भारताकडून पराभव, डोक्याचा ताप कमीच होईना! खेळाडू आता दुखापतीमुळे बाहेर
2

IND vs NZ: T20 सिरीजमध्ये भारताकडून पराभव, डोक्याचा ताप कमीच होईना! खेळाडू आता दुखापतीमुळे बाहेर

ICC T20 रँकिंगमध्ये मोठा उलटफेर! Abhishek Sharma ने ईशान किशनला पछाडलं; बनला जगातील नंबर 1 फलंदाज
3

ICC T20 रँकिंगमध्ये मोठा उलटफेर! Abhishek Sharma ने ईशान किशनला पछाडलं; बनला जगातील नंबर 1 फलंदाज

IND Vs NZ: न्यूझीलंड मायदेशात लाज राखणार? अभिषेक शर्मा अन् वैभव सूर्यवंशी…; चौथा सामना कधी?
4

IND Vs NZ: न्यूझीलंड मायदेशात लाज राखणार? अभिषेक शर्मा अन् वैभव सूर्यवंशी…; चौथा सामना कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.