
IND U19 vs UAE U19: Vaibhav Suryavanshi's stormy century and India's world record! India became the first team to achieve 'this'
World record of Indian Under-19 team : भारत १९ वर्षांखालील संघाने आशिया कप स्पर्धेत मोठा पराक्रम रचला आहे. आशिया कप इतिहासात भारताने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या शानदार शतकामुळे भारताने शुक्रवारी युएईविरुद्ध ५० षटकांत ६ बाद ४३३ धावांचा मोठा डोंगर उभा केला. १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. युएईविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ४०० धावा करून, भारत १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात तीन वेळा ४०० पेक्षा जास्त धावा करण्याचा मान मिळवला आहे.
हेही वाचा : 2030 Commonwealth Games : भारताला 2010 चा कलंक पुसून टाकण्याची संधी! क्रीडा महासत्तेकडे भारताची वाटचाल
युएईने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. भारत १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात तीन वेळा ४०० पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी, भारताचा १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च धावसंख्या २००४ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध ४२५/३ धावसंख्या उभी केली होती. २०२२ मध्ये त्यांनी युगांडाविरुद्ध ४०५/५ धावसंख्या उभी केली होती.
वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये युएईविरुद्ध फक्त ५६ चेंडूत शतक ठोकून इतिहास घडवला आहे. वैभव सूर्यवंशीने एसीसी पुरुषांच्या १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये त्याच्या स्फोटक शतकादरम्यान अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. तो पुरुषांच्या १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. तो १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज देखील बनला आहे.
वैभव सूर्यवंशीने ९५ चेंडूत १७१ धावांची खेळी साकारली. यांमदये त्याने ९ चौकार आणि १४ षटकार ठोकले आहेत. वैभवने १४ षटकार ठोकून इतिहास रचला आहे. आशिया युवा १९ वर्षांखालील कपसाठी एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम दर्वेश रसूलीच्या नावावर जमा होता. २०१७ मध्ये दर्वेश रसूलीने १०५ धावांच्या डावात १० षटकार ठोकले आहे.
हेही वाचा : IND vs SA 2nd T20 : दक्षिण आफ्रिकेचा भीम पराक्रम! भारतीय भूमीत ‘हा’ कारनामा करणारा जगातील ठरला पहिलाच संघ