Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवृत्तीनंतर, या धडाकेबाज ऑस्ट्रेलियन खेळाडूने या लीगमध्ये केले पदार्पण, गोलंदाजांना जोरदार फटकारले

सध्या अमेरिकेत मेजर लीग क्रिकेटची धूम सुरू आहे. या लीगमध्ये अनेक देशांचे खेळाडू धमाल करत आहेत. त्याच वेळी, टेक्सास सुपर किंग्ज आणि सिएटल ऑर्कास यांच्यात झालेल्या सामन्यात खेळाडूची स्फोटक कामगिरी पाहायला मिळाली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 17, 2025 | 02:10 PM
फोटो सौजन्य : X

फोटो सौजन्य : X

Follow Us
Close
Follow Us:

मार्कस स्टोइनिस : यंदा अनेक जगभरातील क्रिकेट खेळाडूंनी निवृती घेतली आहे. पण काही असेही खेळाडू आहेत ज्यांनी आंंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृती घेतली आहे पण अजुनही फ्रॅन्चायझी क्रिकेट खेळत आहेत. आयपीएल त्याचबरोबर मेजर क्रिकेट लीगसारख्या प्रसिद्ध स्पर्धा खेळाडू खेळतात. यामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात कमाई होते. सध्या अमेरिकेत मेजर लीग क्रिकेटची धूम सुरू आहे. या लीगमध्ये अनेक देशांचे खेळाडू धमाल करत आहेत.

त्याच वेळी, टेक्सास सुपर किंग्ज आणि सिएटल ऑर्कास यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूची स्फोटक कामगिरी पाहायला मिळाली.  एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, या खेळाडूने मेजर लीग क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे आणि त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच विरोधी गोलंदाजांना चकवा दिला आहे. होय, आम्ही मार्कस स्टोइनिसबद्दल बोलत आहोत. जो मेजर लीग क्रिकेटमध्ये त्याचा पहिला सिझनमध्ये खेळत आहे.

नाद करा पण दक्षिण आफ्रिकेचा कुठं… चॅम्पियन झाल्यानंतर कर्णधाराच्या नावावर तयार केलं गाण, Video Viral

मार्कस स्टोइनिस हा मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या हंगामात टेक्सास सुपर किंग्जचा भाग आहे. या सामन्यात स्टोइनिसने शानदार फलंदाजी केली आणि फक्त १२ चेंडूत २८ धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान स्टोइनिसने ४ शानदार षटकार मारले. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २३३.३३ होता. याशिवाय, गोलंदाजी करताना मार्कसने २ षटकांत फक्त ४ धावा देऊन १ बळी घेतला.

Yellow blood
Perfect tailer made player for CSK or super kings teams
Arrived today !
Marcus Stoinis
Super king now pic.twitter.com/6GiYlktQtp

— MisterTerrific (@imisterterrific) June 17, 2025

स्टोइनिसने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आधी फेब्रुवारीमध्ये एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर, स्टोइनिसची चमकदार कामगिरी आयपीएलमध्येही दिसून आली. आयपीएल २०२५ मध्ये, स्टोइनिसने फलंदाजी करताना १६० धावा केल्या, त्याशिवाय त्याने गोलंदाजीत ४ विकेट्स घेतल्या.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टेक्सास सुपर किंग्जने २० षटकांत ६ गडी गमावून १५३ धावा केल्या. यामध्ये सैतेजाच्या ३० धावा, स्टोइनिसच्या २८ आणि डॅरिल मिशेलच्या २५ धावांचा समावेश होता. सिएटल ऑर्कासकडून गोलंदाजी करताना जसदीप सिंग आणि हरमीत सिंग यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. मेजर क्रिकेट लीगचे अनेक सामने मनोगरंजक झाले आहेत. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यामध्ये वर्ल्ड रेकाॅर्ड नावावर केला. 

Web Title: After retirement this explosive australian player marcus stoinis made his debut in this league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 01:31 PM

Topics:  

  • cricket
  • MLC 2025
  • Sports

संबंधित बातम्या

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश
1

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश

Yash Dayal: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर यश दयालचे करियर संकटात, यूपी टी-२० लीगने घातली बंदी!
2

Yash Dayal: लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर यश दयालचे करियर संकटात, यूपी टी-२० लीगने घातली बंदी!

Asia Cup 2025 : बाबर आझमला संघामधून का वगळलं? मुख्य प्रशिक्षकांने दिले उत्तर
3

Asia Cup 2025 : बाबर आझमला संघामधून का वगळलं? मुख्य प्रशिक्षकांने दिले उत्तर

Asia Cup 2025 : ना बाबर ना रिझवान…आशिया कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा! या खेळाडूच्या हाती दिली टीमची कमान
4

Asia Cup 2025 : ना बाबर ना रिझवान…आशिया कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा! या खेळाडूच्या हाती दिली टीमची कमान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.