फोटो सौजन्य : ICC
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा गाण्याचा व्हिडीओ : दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २७ वर्षाचा दुष्काळ संपवला आणि आयसीसी ट्रॉफी संघाच्या नावावर केली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सामना पार पडला. या सामन्यात चौथ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एडन मारक्रम आणि कर्णधार टेंबा बवुमा यांनी त्याच्या कमालीच्या खेळीने संघाला विजयापर्यंत नेले आणि जेतेपद मिळवून दिले. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने लागलेला चोकर टॅग देखील काढून टाकला.
टेंबा बवुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हे जेतेपद मिळवता आले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी देखील कमालीची कामगिरी केली यामध्ये कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी याने मैदानावर कहर केला. आता टेंबा बवुमा आणि त्याचे संघातील सहकाऱ्यांच्या व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. यामध्ये एडन मारक्रम, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी हे सगळे टेंबा बवुमाच्या नावाने गाणे म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाला त्यांची आयसीसी ट्राॅफी मिळवण्यासाठी तब्बल 27 वर्ष लागले आहेत. सामन्याबद्दल सांगायचे झाले तर सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात मागे होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने तिसऱ्या डावामध्ये लवकर विकेट गमावले. यामध्ये मिचेल स्टार्क याने अर्धशतक झळकावले होते त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने 282 धावांची लक्ष्य दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर उभे केले होते. पण खरा खेळ हा चौथ्या डावामध्ये पलटला आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवला.
दक्षिण आफ्रिकेसाठी एडन मार्करम आणि टेंबा बवुमा या दोघांनी कमालीची कामगिरी केली. एडन मार्करम याने संघासाठी शतक झळकावले तर टेंबा बवुमा याने संघासाठी 66 धावाची खेळी खेळली. एडन मार्करम हा दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी ट्रम्प कार्ड ठरला. त्याने १३६ धावांची खेळी खेळली. पहिल्या डावामध्ये कागिसो रबाडा याने ५१ धावा देत ५ विकेट्स नावावर केले होते तर मार्को जॉन्सन याने देखील संघाला ३ विकेट्स मिळवून दिले.
दुसऱ्या डावामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने फलंदाजी करत असताना टेंबा बवुमा याने ३६ धावा केल्या होत्या. तिसऱ्या डावामधे देखील कागिसो रबाडाची कामगिरी कौतुकास्पद राहिली त्याने तिसऱ्या डावात त्याने ४ विकेट्स घेतले. म्हणजेच त्याने संपूर्ण सामन्यात ९ विकेट्स नावावर केले. तर लुंगी एनगिडी याने देखील तिसऱ्या डावामधे कमाल दाखवली त्याने ३ विकेट्स संघाला मिळवून दिले.