Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Sooryavanshi: निवृत्ती घेताच अजिंक्य रहाणने दाखवला वैभव सूर्यवंशीला आरसा, ‘आंतरराष्ट्रीय आणि IPL आकाशपाताळाचा फरक…’

Vaibhav Sooryavanshi: भारताचा माजी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावाला सामोरे जाण्यासाठी स्वतःला वेळ देण्याचा सल्ला दिला आहे. दोन्ही क्रिकेटमधील फरकही सांगितला

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 06, 2026 | 01:51 PM
अजिंक्यने दाखवला वैभवला वास्तवतेचा आरसा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

अजिंक्यने दाखवला वैभवला वास्तवतेचा आरसा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अजिंक्य रहाणे हा एक उत्तम क्रिकेटपटू असून त्याने नुकतीच निवृत्ती स्वीकारली आहे 
  • वैभव सूर्यवंशीच्या खेळाबाबत त्याने स्पष्ट मत मांडले
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल या दोन्ही खेळातील फरकही सांगितला 
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण भारतीय क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. यावर प्रत्येकाचे काही ना काही मत नक्कीच आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन डावांमध्ये अनुक्रमे १४, १३ आणि १५ धावा करून संघर्ष केल्यानंतर, वैभवने झिम्बाब्वेविरुद्ध आपली लय पकडला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत ५०, २० आणि ८१ धावांची शानदार खेळी केली. IPL मधील त्याच्या कामगिरीमुळे या तरुण फलंदाजाच्या भविष्याबद्दल तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान नुकताच निवृत्त झालेला खेळाडू अजिंक्य रहाणेनेदेखील याबाबत आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे. 

Ajinkya Rahane Retirement: मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने क्रिकेटला केला अलविदा! IPL देखील खेळणार नाही, वाचा संपूर्ण करिअर

आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप मोठा फरक 

नुकताच निवृत्त झालेला भारताचे माजी दिग्गज खेळाडू अजिंक्य रहाणे यांनी Vaibhav Sooryavanshi च्या कसोटी क्रिकेट खेळण्याच्या संधींवर भाष्य केले आणि त्याला वास्तवाची जाणीव करून दिली. एका पॉडकास्टवर बोलताना रहाणे म्हणाला की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खूप मोठा फरक असल्याने, सध्या वैभववर अतिरिक्त दबाव टाकणे अन्यायकारक ठरेल.

अजिंक्य पुढे म्हणाला की, “सध्या काहीही सांगणे कठीण आहे.” मला असं काहीही बोलायचं नाही ज्यामुळे या मुलावरचा दबाव वाढेल, कारण लोक आधीच त्याच्याबद्दल खूप बोलत आहेत. तो फक्त दोन आयपीएल हंगाम खेळला आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप फरक आहे. देशासाठी खेळताना दबाव खूप जास्त असतो. आयपीएलमध्ये ४-५ षटकांत ७० धावा करणे सोपे आहे, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर तेच लक्ष्य गाठणे ही एक वेगळीच बाब आहे. त्यामुळे, त्याला त्याचा खेळ खेळू द्या आणि पुढे जाऊ द्या.

आयर्लंड दौऱ्यात संधी द्यायला हवी होती

दुसरीकडे, भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने आयर्लंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी न देण्याच्या भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कैफच्या मते, आयपीएल २०२६ मध्ये ऑरेंज कॅप जिंकलेल्या या स्फोटक फलंदाजाला आयर्लंडविरुद्धच संधी द्यायला हवी होती, जेणेकरून इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वीचा त्याचा संकोच दूर झाला असता.

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना, मोहम्मद कैफने संघ व्यवस्थापनावर निशाणा साधत म्हटले की, अशा ‘एक्स-फॅक्टर’ खेळाडूला संघात संधी देण्याऐवजी त्याला पाणी द्यायला लावले.

‘तू तुझ्या नावाप्रमाणेच अजिंक्य’…Ajinkya Rahane च्या निवृत्तीवर पत्नी राधिकाची भावनिक पोस्ट

इंग्लंडमध्ये चिंता कमी झाली असती

वैभवबद्दल कैफ म्हणाला, “वैभव एक ‘एक्स-फॅक्टर’ खेळाडू आहे. त्याने आयपीएलमध्ये केवळ एक-दोन सामन्यांमध्येच नव्हे, तर संपूर्ण हंगामात ऑरेंज कॅप जिंकून आपली क्षमता सिद्ध केली आहे. तो आयर्लंडमध्ये खेळायला हवा होता, ज्यामुळे त्याची चिंता कमी झाली असती. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, पण तुम्ही त्याला आधी पाणी प्यायला लावले. तो एक विशेष खेळाडू आहे आणि त्याला विशेष वागणूक मिळायला हवी होती. जर तो आयर्लंडमध्ये खेळला असता, तर त्याला UK मध्ये कोणतीही चिंता वाटली नसती.”

Web Title: Ajinkya rahane on vaibhav sooryavanshi career difference between ipl and international cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • cricket news
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND vs JPN: भारत आणि जपान ऐतिहासिक सामन्यासाठी तयार, मात्र पावसाने केला खोळंबा; थोड्याच वेळात होणार निरीक्षण
1

IND vs JPN: भारत आणि जपान ऐतिहासिक सामन्यासाठी तयार, मात्र पावसाने केला खोळंबा; थोड्याच वेळात होणार निरीक्षण

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी
2

अभिषेक बच्चनच्या ETPL ला मिळाले पहिलेवहिले विजेतेपद! एडिनबर्ग कॅसल रॉकर्सने उंचावली ट्रॉफी

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय
3

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज
4

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.