
photo- social media
Vaibhav Sooryavanshi: ‘मला फक्त खेळायचं नाही तर 10-20 वर्षे…’.; वैभवने सांगितला भविष्याचा प्लॅन
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या झ्वेरेव्ह आणि फॉर्मात असलेल्या कोबोली यांच्यात एक अटीतटीचा सामना झाला. रोलँड गॅरोसच्या लाल मातीवर खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात झ्वेरेव्हने ६-१, ४-६, ६-४, ६-७(५), ६-१ अशा फरकाने विजय मिळवला. सुरुवातीला झ्वेरेव्हने एकतर्फी वर्चस्व गाजवत पहिला सेट जिंकला. त्याने आपल्या शक्तिशाली सर्व्हिस आणि बेसलाइन शॉट्सने पहिल्या सेटमध्ये कोबोलीला कोणतीही संधी दिली नाही आणि पहिला सेट ६-१ ने सहज जिंकला. मात्र कोबोलीने जबरदस्त पुनरागमन करत सामना चुरशीचा बनवला. त्यानंतर झ्वेरेव्हने आपल्या अनुभवाचा फायदा उचलत तिसरा सेट ६-४ ने जिंकला. मात्र, चौथ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. टायब्रेकरमध्ये झ्वेरेव्ह ३-१ ने आघाडीवर होता, पण कोबोलीने झुंजार वृत्ती दाखवत बाजी पलटवली आणि तो सेट ७-६ (७-५) ने जिंकून सामना पाचव्या सेटमध्ये नेला. झ्वेरेव्हने अखेर अंतिम सेट ६-१ ने जिंकून इतिहास रचला. विजयानंतर झ्वेरेव्हच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. इटलीच्या फ्लावियो कोबोलीने संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी केली. पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम अंतिम फेरी गाठणाऱ्या या युवा खेळाडूने झ्वेरेव्हला कॉंटे की टक्कर दिली.
HE DID IT 🏆#RolandGarros pic.twitter.com/SFJgCRZon0 — Roland-Garros (@rolandgarros) June 7, 2026
२४-वेळा ग्रँड स्लॅम विजेता नोव्हाक जोकोविच स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे तसेच दोन वेळचा गतविजेता अल्काराझ उजव्या मनगटाच्या दुखापतीमुळे स्पर्धेपूर्वीच बाहेर पडला होता. म्हणून झ्वेरेव्हला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते.
अलेक्झांडर झ्वेरेव्हचा विजय हा जर्मन टेनिससाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे. १९९६ मध्ये बोरिस बेकर (ऑस्ट्रेलियन ओपन) यांच्यानंतर ग्रँड स्लॅम पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारा तो पहिला जर्मन पुरुष खेळाडू ठरला आहे. झ्वेरेव्ह यापूर्वी तीन ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्यांमध्ये पोहोचला होता, परंतु त्याचे विजेतेपद थोडक्यात हुकले होते. अखेरीस, आपल्या चौथ्या प्रयत्नात, त्याने पॅरिसच्या लाल मातीवर ती चकचकीत ट्रॉफी उंचावली.