Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय Hockey ची रणधुमाळी! आंध्र प्रदेश, आसाम अन्…; कोणते संघ जिंकले?

‘बी’ विभागातील पूल ‘अ’मधील सामन्यात हॉकी आंध्र प्रदेशने दिल्ली हॉकीवर २-१ असा निसटता विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 15, 2026 | 03:40 PM
पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय Hockey ची रणधुमाळी! आंध्र प्रदेश, आसाम अन्…; कोणते संघ जिंकले?
Follow Us
Follow Us:

पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू आहे हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा
नेहरूनगरमधील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू होते सामने
‘बी’ आणि ‘सी’ या दोन विभागांमध्ये खेळवले जात आहे स्पर्धा

पुणे: पिंपरी-चिंचवड येथील नेहरूनगरमधील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये गुरुवारी हॉकी आंध्र प्रदेश, आसाम हॉकी, हॉकी कर्नाटक आणि ले पुडुचेरी हॉकी यांनी आपापल्या पूलमधील सामन्यांत शानदार विजय नोंदवत पूर्ण गुणांची कमाई केली. हॉकी महाराष्ट्राच्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेतील सामने ‘बी’ आणि ‘सी’ या दोन विभागांमध्ये खेळवले जात आहेत.

‘बी’ विभागातील पूल ‘अ’मधील सामन्यात हॉकी आंध्र प्रदेशने दिल्ली हॉकीवर २-१ असा निसटता विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. आंध्र प्रदेशकडून राजेश्वरी व्यदादी साई धनाने १३व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर अंकिता बोम्मूने ३०व्या मिनिटाला गोल नोंदवत आंध्र प्रदेशची आघाडी भक्कम केली. दिल्ली हॉकीकडून मेहतो निशाने ३३व्या मिनिटाला गोल करत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र, त्यानंतर दिल्लीला बरोबरीचा गोल करता आला नाही आणि आंध्र प्रदेशने २-१ असा विजय मिळवत महत्त्वाचे पूर्ण गुण आपल्या खात्यात जमा केले.

Yezdi Roadster 2026 : हॉकीचा माजी कर्णधार पी. आर. श्रीजेशच्या ताफ्यात नवी ‘येझदी’! ग्रीन मांबा रोडस्टरच्या लुकने जिंकले मन

कर्नाटकचा तमिळनाडूवर ५-१ असा दणदणीत विजय
‘बी’ विभागातील पूल ‘ब’मध्ये हॉकी कर्नाटकने हॉकी युनिट ऑफ तमिळनाडूचा ५-१ असा एकतर्फी पराभव केला. कर्नाटककडून लक्ष्मीने तिसऱ्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर मनीष पोन्नम्मा सीडीने नवव्या मिनिटाला गोल नोंदवून आघाडी वाढवली. या सामन्यात व्यष्णवी अरुल हिने अप्रतिम कामगिरी करत शानदार हॅट्ट्रिक नोंदवली. तिने १८व्या, ३१व्या आणि ३६व्या मिनिटाला गोल करत कर्नाटकच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तमिळनाडूकडून प्रियदर्शिनी के हिने चौथ्या मिनिटाला एकमेव गोल केला. मात्र, त्यानंतर कर्नाटकच्या आक्रमक खेळासमोर तमिळनाडूचा बचाव टिकू शकला नाही.

आसामचा केरळवर ४-२ असा विजय
‘बी’ विभागातील पूल ‘अ’मध्ये आसाम हॉकीने केरळ हॉकीवर ४-२ असा विजय मिळवला. आसामच्या विजयाची प्रमुख शिल्पकार चौरसिया तान्या ठरली. तिने १७व्या, ४१व्या आणि ४४व्या मिनिटाला गोल करत आसामच्या आक्रमणाला धार दिली आणि संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. केरळकडून ज्योती झाक्सा हिने ४२व्या आणि ५१व्या मिनिटाला गोल करत संघाचा प्रतिकार कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आसामने सामन्यावर नियंत्रण राखत ४-२ असा विजय आपल्या नावावर केला.

Nagpur : १३ ऑगस्टला हॉकीचे अस्तित्व संपणार ; भवितव्यावर प्रश्नचिन्ह

दोन सामने वॉकओव्हरने निकाली
‘सी’ विभागातील दोन सामने वॉकओव्हरने निकाली काढण्यात आले. पूल ‘अ’मध्ये दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव हॉकीला त्रिपुरा ऑलिम्पिक असोसिएशनविरुद्ध ५-० असा विजय बहाल करण्यात आला. त्रिपुरा संघ सामना खेळण्यासाठी उपस्थित न राहिल्याने हा निर्णय घेण्यात आला.तसेच, पूल ‘ब’मध्ये हॉकी गुजरातलाही तेलंगणा हॉकीविरुद्ध ५-० असा वॉकओव्हरचा विजय देण्यात आला.

Web Title: Andhra pradesh karnataka and assam win the hockey india junior womens national championship at pcmc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Hockey
  • PCMC News
  • Pune Sports News

संबंधित बातम्या

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने
1

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…
2

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…

Asian Games 2026 : ‘चक दे इंडिया’; अखेर पोरींनी करून दाखवलं, तब्बल 44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्ण जिंकले
3

Asian Games 2026 : ‘चक दे इंडिया’; अखेर पोरींनी करून दाखवलं, तब्बल 44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्ण जिंकले

तुफानी फलंदाजी, भेदक गोलंदाजी अन् थरारक विजय; स्टॅलियंस ठरले DSP Cricket League चे विजेते
4

तुफानी फलंदाजी, भेदक गोलंदाजी अन् थरारक विजय; स्टॅलियंस ठरले DSP Cricket League चे विजेते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.