Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुफानी फलंदाजी, भेदक गोलंदाजी अन् थरारक विजय; स्टॅलियंस ठरले DSP Cricket League चे विजेते

Cricket: अष्टपैलू कामगिरीसाठी पवन आनंदला 'सामनावीर' घोषित करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना भव्य करंडक देऊन गौरविण्यात आले. हे पारितोषिक वितरण योगेश सातव यांच्या हस्ते पार पडले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 01, 2026 | 09:45 PM
DSP Trophy Monsoon League

DSP Trophy Monsoon League

Follow Us
Follow Us:
  • डीएसपी करंडकामध्ये स्टॅलियंस संघ चॅम्पियन
  • अंतिम फेरीत वामोस क्रिकेट क्लबवर ८ धावांनी मात
  • पवन आनंद ठरला विजयाचा शिल्पकार
पुणे/Cricket: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंटस यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या ‘डीएसपी करंडक मान्सून लीग मिश्र कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धे’चे विजेतेपद स्टॅलियंस संघाने पटकावले आहे. अंतिम सामन्यात पवन आनंद याने केलेल्या सुरेख अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्टॅलियंस संघाने वामोस क्रिकेट क्लब संघाचा ८ धावांनी पराभव करत जेतेपदावर नाव कोरले.

आव्हाळवाडी येथील राजगड स्पोर्ट्स क्रिकेट क्लब मैदानावर पार पडलेल्या या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्टॅलियंस संघाने निर्धारित २० षटकांत ७ बाद १६५ धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. रोहित गायकवाडने ४८ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ५९ धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याला ऋतुराज गायकवाड (२४), पवन आनंद (२३), नाबाद विक्रांत दुबे (२०), ओमकार मेटे (१५) आणि अभिजीत तिवारी (१०) यांनी उपयुक्त साथ देत संघाचा डाव सावरला. वामोस क्रिकेट क्लबकडून गोलंदाजीत वामसी वामोसने ३ गडी बाद करत २६ धावा दिल्या, तर जगत खमारने १५ धावांत २ बळी मिळवले.

विजेत्यांना करंडक देऊन गौरविले

विजयासाठी मिळालेल्या १६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वामोस क्रिकेट क्लबला २० षटकांत ९ बाद १५७ धावांपर्यंतच मजल मारता आली. सलामीवीर हितेश शर्माने ४६ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकारासह ५८ धावा फटकावून एकाकी झुंज दिली. तसेच मुकेश वासवानी (२९), वामसी वामोस (१५) आणि अनुज राय (१२) यांनी विजयासाठी प्रयत्न केले; मात्र स्टॅलियंसच्या भेदक माऱ्यासमोर ही लढत अपुरी ठरली. स्टॅलियंसकडून गोलंदाजीत पवन आनंदने २३ धावांत ४ महत्त्वाचे गडी बाद करत सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकवले. त्याला मयूर मिस्त्री (२-२५) आणि विजयकुमार अय्यर (१-१९) यांनी अचूक मारा करत चांगली साथ दिली.

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

अष्टपैलू कामगिरीसाठी पवन आनंदला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना भव्य करंडक देऊन गौरविण्यात आले. हे पारितोषिक वितरण योगेश सातव यांच्या हस्ते पार पडले.

सामन्यांचा संक्षिप्त धावफलक

: स्टॅलियंस: २० षटकांत ७ बाद १६५ धावा

 (रोहित गायकवाड ५९ (४८ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार), ऋतुराज गायकवाड २४, पवन आनंद २३, नाबाद विक्रांत दुबे २०, ओमकार मेटे १५, अभिजीत तिवारी १०; वामसी वामोस ३-२६, जगत खमार २-१५)

वि. वि.

: वामोस क्रिकेट क्लब: २० षटकांत ९ बाद १५७ धावा

(हितेश शर्मा ५८ (४६ चेंडू, ८ चौकार, १ षटकार), मुकेश वासवानी २९, वामसी वामोस १५, अनुज राय १२; पवन आनंद ४-२३, मयूर मिस्त्री २-२५, विजयकुमार अय्यर १-१९)

  • निकाल: स्टॅलियंस संघ ८ धावांनी विजयी.
  • सामनावीर: पवन आनंद (२३ धावा व ४-२३)
    “
पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

इतर वैयक्तिक पारितोषिके

  • सर्वोत्कृष्ट फलंदाज: गणेश खांडवे
  • सर्वोत्कृष्ट गोलंदाज: मयूर मिस्त्री
  • मालिकावीर (प्लेअर ऑफ द सिरीज): वामसी वामोस

Web Title: Stallions team defeated vamos cricket club by 8 runs in dsp karandak monsoon league

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • cricket news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Chess च्या विश्वात भारताचा तिरंगा उंचावला! सलग तिसऱ्यांदा पटकावला मानाचा करंडक, उझबेकिस्तानमध्ये…
1

Chess च्या विश्वात भारताचा तिरंगा उंचावला! सलग तिसऱ्यांदा पटकावला मानाचा करंडक, उझबेकिस्तानमध्ये…

जिल्हास्तरीय कबड्डीत संदेश महाविद्यालयाचे दुहेरी यश; मुलांच्या संघाने पटकावले नवव्यांदा विजेतेपद
2

जिल्हास्तरीय कबड्डीत संदेश महाविद्यालयाचे दुहेरी यश; मुलांच्या संघाने पटकावले नवव्यांदा विजेतेपद

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
3

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…
4

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.