AI and Google Help Find Missing Woman After 2.5 Years in Maharashtra ( महाराष्ट्रात अडीच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध लागला; एआय (AI) आणि गुगलची मदत ठरली मोलाची ) फोटो सौजन्य AI
Chatgpt मुळे आणि संस्थेच्या सदस्यांनी त्या महिलेकडून तिच्या गावाविषयी, कुटुंबाविषयी आणि भूतकाळाविषयी थोडी माहिती गोळा केली. या माहितीच्या आधारे, डिजिटल माध्यमांवर शोधमोहीम सुरू करण्यात आली.
नेमक काय घडलं ? झुलेखा शेख या मानसिक तणावामुळे घरून निघाल्या होत्या. ३ एप्रिल २०२४ रोजी त्या मुंबईत पोलिसांना मिळाल्यानंतर, कुर्ला न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पांडूर येथील ‘संविता आश्रम’ (जीवन आनंद संस्था) येथे ठेवण्यात आले होते.
‘जीवन आनंद संस्था’चे ट्रस्टी किसन चौरे आणि त्यांच्या टीमने झुलेखा यांच्याशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या गावाविषयी, कुटुंबाविषयी आणि भूतकाळाविषयी काही तुटपुंज्या आणि अस्पष्ट माहिती गोळा केली.
यासाठी माहितीचा आणि काही स्थानिक संकेतांचा वापर करून टीमने ChatGPT आणि Google Search चा वापर करुन AI च्या मदत घेण्यात आली. एआयने या अपूर्ण माहितीचे विश्लेषण करून त्या महिलेचे मूळ गाव परभणी असल्याचे शोधून काढले.
परभणी येथील ‘निर्भया पथक’ पोलिसांच्या मदतीने संस्थाच्या टीमने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. अडीच वर्षांनंतर कुटुंबियांशी फोनवर बोलल्यानंतर, त्यांचे पती मुखिद शेख ९ नोव्हेंबर रोजी संविता आश्रमात पोहोचले आणि झुलेखा यांना सन्मानाने घरी घेऊन गेले.
Sugarcane Farmers Protest : शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम द्या! साताऱ्यात ऊसदरासाठी संघर्ष






