Handball Championship : राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत भंडाराचा डंका! सातारा उपविजेता, नागपूरला तिसरे स्थान
Handball Championship : महाराष्ट्र हॅण्डबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आणि सातारा जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशन व ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने वाई येथे आयोजित 48 व्या राज्यस्तरीय ज्युनिअर मुलींच्या अजिंक्यपद हॅण्डबॉल स्पर्धेत भंडारा जिल्हा संघाने विजेतेपद पटकावले. चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत यजमान सातारा जिल्हा संघ उपविजेता ठरला, तर नागपूर जिल्हा संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सातारा जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशनचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत राज्यातील २३ जिल्हा संघांनी सहभाग नोंदवला होता. तीन दिवसांत विविध जिल्हा संघांमध्ये अत्यंत चुरशीच्या आणि रोमहर्षक लढती पाहायला मिळाल्या.
स्पर्धेसाठी मैदान, निवास, भोजन व इतर सर्व व्यवस्था अत्यंत नेटकेपणाने केल्याबद्दल राज्यभरातून आलेल्या खेळाडू व मार्गदर्शकांनी ज्ञानदीप स्कूल आणि सातारा जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशनचे कौतुक करत आभार मानले.
स्पर्धेतील विजेत्या संघांना विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एकनाथ जगताप, संचालक दिलीप चव्हाण, महाराष्ट्र हॅण्डबॉल असोसिएशनचे सचिव रणधीर सिंग, प्राचार्या शुभांगी पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सतीश डोंढगे व मिलिंद शिंदे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रा. डॉ. समीर पवार, अमर धापते, विक्रम निकम, हरेश चव्हाण, अक्षय करपे, संतोष चौधरी, वजीर शेख, प्रा. शिवराज तलवारे, शुभम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत पंच म्हणून अमित वाघांबरे, निलेश साळोखे, संतोष पाटील, शुभम इंग्लजकर, राकेश बनसोडे, आकाश चौगुले, शंभू देवकर, सुशांत साळवी, दर्शन रोकडे, साहिल इनामदार, जय झांबरे, अन्वय चावरे, सुमित पोतेकर, आशुतोष साळुंखे आणि सचिन कुदळे यांनी काम पाहिले.
दिवाळी झाली तरी Pune Railway Station वरून गर्दी हटेना! 13 दिवसांत 22 लाख प्रवासी तर पुणे विभागाने…
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातारा हॅण्डबॉल असोसिएशनचे सचिव व क्रीडा विभाग प्रमुख सचिन लेंभे यांनी केले, तर विक्रम निकम यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवराज वरे, विक्रांत पोळ, गणेश निकम, सागर डेरे, अमोल खडसरे, श्रुती मांढरे, विजय चव्हाण, अर्जुन जाधव, ओम लेंभे, ज्ञानदीप स्कूलचे खेळाडू, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व हॅण्डबॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Ans: भंडारा जिल्हा संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
Ans: यजमान सातारा जिल्हा संघाने उपविजेतेपद मिळवले.
Ans: महाराष्ट्र हॅण्डबॉल असोसिएशनच्या मान्यतेने सातारा जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशन आणि ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.






