Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chess Tournament : महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेत अर्ह वाघमारेचा डबल धमाका!

Chess Tournament : एलआयसी-मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत अर्ह वाघमारेने १३ आणि १४ वर्षांखालील गटांत विजेतेपद पटकावले. अनन्या चव्हाण १० वर्षांखालील गटात, तर एरिक पिकार्डो सहा वर्षांखालील गटात अव्वल ठरला. स्पर्धेत २१५ खेळाडू सहभागी झाले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 26, 2026 | 08:48 PM
Chess Tournament : महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेत अर्ह वाघमारेचा डबल धमाका!

Chess Tournament : महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेत अर्ह वाघमारेचा डबल धमाका!

Follow Us
Follow Us:
  • १३ आणि १४ वर्षांखालील गटांत पटकावले विजेतेपद
  • १० वर्षांखालील गटात अनन्या चव्हाणची बाजी
  • २१५ शालेय बुद्धिबळपटूंचा सहभाग
 

 एलआयसी-मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत (Chess Tournament) आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित अर्ह वाघमारेने दुहेरी विजेतेपद पटकावत लक्षवेधी कामगिरी केली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आणि आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने, भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) सहप्रायोजकत्वाने आयोजित या स्पर्धेत अर्हने १३ आणि १४ वर्षांखालील अशा दोन्ही गटांत अव्वल स्थान मिळवले.

१३ वर्षांखालील गटात अर्हने सर्व सामने जिंकत निर्विवाद वर्चस्व गाजवले. मात्र, १४ वर्षांखालील गटाचे विजेतेपद मिळवताना त्याला कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला. निर्णायक पाचव्या फेरीत एकमेव आघाडीवर असलेल्या फिडे गुणांकित प्रणव जैनला अर्हने ३२व्या चालीत पराभूत केले. या विजयासह ४.५ गुणांची कमाई करत त्याने प्रथम स्थान पटकावले.

दुहेरी विजेतेपद मिळवणाऱ्या अर्ह वाघमारेचा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील फिडे गुणांकित सब-ज्युनियर बुद्धिबळपटूंसह एकूण २१५ शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे, महानगरपालिका शाळांतील २८ खेळाडूंनी प्रथमच या स्पर्धेत सहभागी होत चांगली कामगिरी केली.

१० वर्षांखालील गटात अनन्या चव्हाण अव्वल

१० वर्षांखालील गटात अनन्या चव्हाणने फिडे गुणांकित अंश शर्मा आणि ग्रीवा जैन यांचे आव्हान परतवून लावले. तिने साखळीतील पाचही सामने जिंकत विजेतेपदावर नाव कोरले. अंश शर्मा (४ गुण) याने दुसरे, ग्रीवा जैन (४ गुण) हिने तिसरे, साधना खुमार (३ गुण) हिने चौथे, तर माहीर वडांबे (३ गुण) याने पाचवे स्थान मिळवले.

Saransh Jain ची घातक गोलंदाजी! फिरकीच्या जाळ्यात अडकले बिहारचे फलंदाज! ७ विकेट्स घेत संघाला ९९ धावांत गुंडाळलं

सहा वर्षांखालील गटात एरिक पिकार्डो प्रथम

सहा वर्षांखालील गटात एरिक पिकार्डोने पाच गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. आरीन शुक्ला (४ गुण) दुसऱ्या, विहान अहुजा (४ गुण) तिसऱ्या, झेउस वाडिया (४ गुण) चौथ्या, तर सोहम कांबळी (४ गुण) पाचव्या स्थानावर राहिला.

१४ वर्षांखालील गटात अर्ह वाघमारेने ४.५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. प्रणव जैन (४ गुण) दुसऱ्या, अर्हम गाडा (४ गुण) तिसऱ्या, आर्यन उपरकर (३.५ गुण) चौथ्या, तर मयुरेश पाटील (३.५ गुण) पाचव्या स्थानावर राहिला.

Youth Olympics 2026 साठी भारताचा 17 खेळाडूंचा संघ जाहीर; 11 खेळांत दाखवणार दम

मान्यवरांची उपस्थिती

मुंबई महापौर, सिबीईयुएम, आरएमएमएस आणि मुंबई शहर बुद्धिबळ संघटना यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली. पारितोषिक वितरण समारंभाला माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ, क्रीडापटू गोविंदराव मोहिते, क्रीडाप्रेमी सुनील साळवी, विष्णू तांडेल, जनार्दन मोरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आणि सिबीईयुएमचे पदाधिकारी उपस्थित होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एलआयसी-मुंबई महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेत दुहेरी विजेतेपद कोणी मिळवले?

    Ans: अर्ह वाघमारेने १३ आणि १४ वर्षांखालील गटांत विजेतेपद पटकावले.

  • Que: स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी सहभाग घेतला?

    Ans: या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतील बुद्धिबळपटूंसह एकूण २१५ शालेय खेळाडूंनी सहभाग घेतला.

  • Que: अर्ह वाघमारेचा पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला?

    Ans: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अर्ह वाघमारेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Web Title: Arh waghmare double title lic mumbai mayor cup school chess tournament rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • BMC Mayor
  • Chess Championship
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Eknath Shinde : ‘राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ’; संतांच्या आशीर्वादाने कुंभ यशस्वी करणार – एकनाथ शिंदे
1

Eknath Shinde : ‘राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ’; संतांच्या आशीर्वादाने कुंभ यशस्वी करणार – एकनाथ शिंदे

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा
2

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा

Chess Tournament : बुद्धिबळ स्पर्धेत रिहान कुळकर्णी, अर्हा वाघमारे गटविजेते
3

Chess Tournament : बुद्धिबळ स्पर्धेत रिहान कुळकर्णी, अर्हा वाघमारे गटविजेते

Manoj Jarange Audio Clip Row : ‘एकनाथ शिंदेंनी हिंमत केली नसती तर…’ प्रतापराव जाधवांचं मोठं विधान, जरांगेच्या चौकशीची मागणी
4

Manoj Jarange Audio Clip Row : ‘एकनाथ शिंदेंनी हिंमत केली नसती तर…’ प्रतापराव जाधवांचं मोठं विधान, जरांगेच्या चौकशीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.