Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badminton कोर्टवर भारताचा डंका! आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अर्जुन रेड्डीचा आदित्य किरणवर थरारक विजय

Badminton : मुलींच्या एकेरीच्या पहिल्या फेरीत अक्षिता मनरल हिने सरयू सूर्यानेनी हिचे आव्हान २१-१३, २१-१७ असे परतवून लावत विजयी सुरुवात केली. केतकी थिटे हिने यवर्णा रेणुश्री श्यामलाराव हिच्यावर २१-१०, २१-१४ असा विजय मिळवला.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 26, 2026 | 03:31 PM
badminton competition

badminton competition

Follow Us
Follow Us:
  • आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूची विजयी सलामी
  • अर्जुन रेड्डीचा थरारक विजय
  • १९ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात
पुणे/Badminton Comeptition: पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित, जागतिक बॅडमिंटन महासंघ, बॅडमिंटन आशिया, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिपलकट्टी यांच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स १९ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताच्या अर्जुन रेड्डी अलुगुवेल्ली याने आठव्या मानांकित संयुक्त अरब अमिरातीच्या आदित्य किरणवर मात करत शानदार विजयी सलामी दिली.

शिवाजीनगर येथील पी. ई. सोसायटीज मॉडर्न पीडीएमबीए क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सभागृहात सुरू झालेल्या या स्पर्धेतील मुलांच्या एकेरीच्या पहिल्या फेरीत अर्जुन रेड्डी अलुगुवेल्लीने आठव्या मानांकित आदित्य किरणचा तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात २१-१८, १९-२१, २१-१९ असा पराभव केला. अर्जुनने निर्णायक गेममध्ये संयमी आणि आक्रमक खेळ करत सामना आपल्या नावावर केला.

BWF World Championships 2026: त्रिसा जॉली-गायत्री गोपीचंदची कमाल; चीनला हरवून १५ वर्षांनंतर महिला दुहेरीत भारताचे पदक

विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश

मुलांच्या गटात दुसऱ्या मानांकित भारताच्या जगशेर सिंग खंगुर्रा याने नीरज नायर पी. एस. याचा २०-२२, २१-०८, २१-१५ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. वैभव सिंग यानेही वर्णन महंता याच्यावर २१-१०, २०-२२, २१-१९ असा विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.चौदाव्या मानांकित भारताच्या कार्तिक रूपा सुहास याने भूतानच्या टंडिन सोनम याचा सरळ दोन गेममध्ये २१-०२, २१-०६ असा पराभव केला. नवव्या मानांकित भारताच्या अश्विन लेनिन मुथुराज याने नेपाळच्या सदिप राय याच्यावर २१-१२, २१-१२ असा सहज विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

BWF World Championship मध्ये सोफिया नोबलचा धुव्वा; PV Sindhu चा विजयी धमाका

मुलींच्या गटातही भारतीय खेळाडूंची आगेकूच

मुलींच्या एकेरीच्या पहिल्या फेरीत अक्षिता मनरल हिने सरयू सूर्यानेनी हिचे आव्हान २१-१३, २१-१७ असे परतवून लावत विजयी सुरुवात केली. केतकी थिटे हिने यवर्णा रेणुश्री श्यामलाराव हिच्यावर २१-१०, २१-१४ असा विजय मिळवला. श्रावणी बिरादार हिनेही प्रभावी खेळ करत लिओनी तायेंजाम हिचा २१-१२, २१-१७ असा पराभव केला. त्यामुळे स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी विविध गटांमध्ये दमदार कामगिरी करत पुढील फेरीतील आपले स्थान निश्चित केले.सुशांत चिपलकट्टी यांच्या स्मरणार्थ आयोजित या स्पर्धेत देश-विदेशातील युवा खेळाडू सहभागी झाले असून, पुढील फेऱ्यांमध्ये अधिक रंगतदार सामने पाहायला मिळणार आहेत.

 

Web Title: Arjun reddy wins pune international grand prix badminton tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Badminton
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय
1

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार
2

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार

Maharashtra Breaking News Today 2026:पत्नी ही पतीची मालमत्ता नाही; कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली पतीची याचिका
3

Maharashtra Breaking News Today 2026:पत्नी ही पतीची मालमत्ता नाही; कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली पतीची याचिका

Indian Post: खांद्यावर जबाबदारीचं ओझं अन चेहऱ्यावर गोड हास्य; टपाल सेवेत ५८.५ टक्के महिलांनी कोरलं आपलं नाव
4

Indian Post: खांद्यावर जबाबदारीचं ओझं अन चेहऱ्यावर गोड हास्य; टपाल सेवेत ५८.५ टक्के महिलांनी कोरलं आपलं नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.