Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्शदीपला माफी मागण्याची गरज नव्हती… गौतम गंभीरने डॅरिल मिशेलसोबतच्या वादावर केली भूमिका स्पष्ट

भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंग आणि न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेल यांच्यात वाद झाला. यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मुलाखतीमध्ये त्यांनी यावर त्याचे मत मांडले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 12, 2026 | 09:26 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

अर्शदीप सिंह डॅरिल मिशेल यांच्या वादावर गौतम गंभीरचे वक्तव्य : भारताने २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. टीम इंडियाचे हे सलग दुसरे टी-२० विश्वचषक विजेतेपद आहे आणि एकूण तिसरे आहे. भारतासाठी ही मोहीम उत्कृष्ट ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एका पराभवाव्यतिरिक्त, भारताने चमकदार कामगिरी केली आणि बहुतेक सामन्यांवर वर्चस्व गाजवले. अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला. या फायनलच्या सामन्यामध्ये दोन खेळाडूंमध्ये वाद झाला याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 

२०२६ च्या टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यादरम्यान, भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंग आणि न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेल यांच्यात वाद झाला, ज्यामुळे परिस्थिती काही काळासाठी चिघळली. तथापि, कर्णधार सूर्यकुमार यादवने परिस्थिती लवकर निवळवली. सामन्यानंतर अर्शदीप सिंगने मिशेलची माफी मागून परिस्थिती निवळण्याचा प्रयत्नही केला. तथापि, भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा असा विश्वास आहे की त्याने असे करायला नको होते. ही घटना न्यूझीलंडच्या डावातील ११ व्या षटकात घडली. 

IPL 2026 : गौतम गंभीरचा खास माणूस Gujarat Titans मध्ये होणार सामील! KKR ला बनवले होते चॅम्पियन

अर्शदीप सिंगच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर डॅरिल मिशेलने सलग दोन षटकार मारले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर अर्शदीपने वाइड यॉर्कर टाकला. मिशेलने चेंडू थेट अर्शदीपकडे वळवला. मिशेल क्रीजच्या थोडा बाहेर उभा होता, ज्यामुळे अर्शदीप सिंगने त्याला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू स्टंपऐवजी डॅरिल मिशेलला लागला. मिशेलला लगेच राग आला आणि प्रकरण तापले. मात्र, त्यावेळी अर्शदीप सिंग काहीही बोलला नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवने हस्तक्षेप करून परिस्थिती हाताळली.

सामन्यानंतर अर्शदीप सिंगने डॅरिल मिशेलची माफी मागितली आणि स्पष्ट केले की त्याने त्याला जाणूनबुजून मारले नाही. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे मत आहे की अर्शदीप सिंग यांनी डॅरिल मिशेलची माफी मागायला नको होती. गंभीर म्हणाले की, अशाच घटना यापूर्वीही घडल्या आहेत, परंतु सोशल मीडियाच्या युगात त्यांना जास्त लक्ष दिले जाते.

IPL 2026 Schedule: प्रतीक्षा संपली! आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; पहिल्या सामन्याचा मान कोणाला?

गंभीरने एएनआयच्या पॉडकास्टवर म्हटले, “हे ठीक आहे. तुम्ही तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहात. तुम्हाला आक्रमकता दाखवावी लागेल. जर तुम्ही परत षटकार मारलात तर त्यात काय चूक आहे? कोणत्याही गोलंदाजाला दोन षटकार मारायला आवडत नाही. आणि मला माझ्या खेळाडूंकडून अशा प्रकारची प्रतिक्रिया पहायची आहे. त्यात काहीही चूक नाही. जरी त्याने सॉरी म्हटले नसते तरी मला कोणतीही अडचण आली नसती. त्याला सॉरी म्हणण्याची गरज नाही.”

गंभीर पुढे म्हणाला, “हो, त्याने माफी मागितली हे चांगले आहे, पण क्रिकेटच्या मैदानावर कोणीही मित्र किंवा शत्रू नसतो. तुमचे काम तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व करणे, तुमच्या देशासाठी जिंकणे आहे. या गोष्टी पूर्वीही होत असत. पण सोशल मीडियाच्या युगात गोष्टी वाढतात, जे मला अनावश्यक वाटते.”

Web Title: Arshdeep didnt need to apologise gautham gambhir stand on daryl mitchell controversy clear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • Arshdeep Singh
  • cricket
  • Daryl Mitchell
  • Sports
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

पुण्यात डाबर ग्लुकोजची ‘ही’ मोहिम सुरू; युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी घेतला निर्णय
1

पुण्यात डाबर ग्लुकोजची ‘ही’ मोहिम सुरू; युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी घेतला निर्णय

ICC Women’s T20 World Cup च्या सामन्यांची वेळ बदलली? ‘हे’ वाचाच; नाहीतर हुकणार भारताचे सामने
2

ICC Women’s T20 World Cup च्या सामन्यांची वेळ बदलली? ‘हे’ वाचाच; नाहीतर हुकणार भारताचे सामने

भारतातील टॉप 5  क्रिकेटपटू आणि त्यांचे ऑटोमोबाईल ब्रँड अॅम्बेसेडरशिप! आत्ताच जाणून घ्या
3

भारतातील टॉप 5 क्रिकेटपटू आणि त्यांचे ऑटोमोबाईल ब्रँड अॅम्बेसेडरशिप! आत्ताच जाणून घ्या

प्रज्ञानंद ठरला नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय; अंतिम सामन्यात जर्मनीच्या व्हिन्सेंटचा केला पराभव
4

प्रज्ञानंद ठरला नॉर्वे बुद्धिबळ विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय; अंतिम सामन्यात जर्मनीच्या व्हिन्सेंटचा केला पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.