(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
आरसीबीला आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, ब्लॅकस्टोनची पर्पेच्युअल प्रायव्हेट इक्विटी स्ट्रॅटेजी आणि बोल्ट व्हेंचर्स यांनी संयुक्तपणे खरेदी केलं आहे. त्यांनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडसोबत ₹१६,७०६ कोटींचा करार केला आहे. त्यामुळे सविस्तरपणे जाणून घेऊया की आरसीबीचे नवे बॉस, आर्यमन बिर्ला कोण आहेत?
आर्यमन बिर्ला यांचे पूर्ण नाव आर्यमन विक्रम बिर्ला आहे. ते आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आहेत. सध्या २८ वर्षांचे असलेले आर्यमन, मध्य प्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत.
आर्यमन बिर्ला आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आणि व्यंकटेश अय्यर यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करतो.
त्यांचा जन्म ९ जुलै १९९७ रोजी मुंबईत झाला आणि ते मध्य प्रदेशातील रेवा येथे स्थायिक झाले, जिथे आदित्य बिर्ला ग्रुपच्या सिमेंट कंपनीचं हेडक्वार्टर आहे.
या डावखुरा फलंदाजाने मध्य प्रदेशसाठी नऊ प्रथम-श्रेणी सामने खेळले असून, त्यात ईडन गार्डन्सवर बंगालविरुद्ध केलेल्या शतकासह ४१४ धावा केल्या आहेत.
त्याने ४ लिस्ट-ए सामन्यांमध्ये ३६ धावा केल्या.
आयपीएल २०१८ च्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला ३० लाख रुपयांना विकत घेतले होते. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही आणि २०२० च्या हंगामापूर्वी फ्रँचायझीने त्याला करारमुक्त केलं.
त्यानंतर त्याने क्रिकेटमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता.
मग तो क्रिकेटमध्ये परतला नाही आणि सध्या तो आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा संचालक आहे.
आरसीबीचे नवे अध्यक्ष झाल्यानंतर बोलताना, आर्यमन बिर्ला म्हणाले, “आरसीबीच्या विकासाच्या पुढील टप्प्याला आकार देण्यासाठी या भागीदारीत एकत्र येण्याचे भाग्य आम्हाला लाभलं आहे. ही भागीदारी क्रीडा, माध्यम आणि ग्राहक व्यवसायांमधील सखोल जाण एकत्र आणते.”






