Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : Abhishek Sharma पाकिस्तानवर कडाडला! आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर टोलवला ऐतिहासिक षटकार 

आशिया कप २०२५ सुपर-४ फेरीच्या सामन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान समोरासमोर होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात अभिषेक शर्माने शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 22, 2025 | 04:08 PM
Asia Cup 2025: Abhishek Sharma hits a six on Pakistan's first ball

Asia Cup 2025: Abhishek Sharma hits a six on Pakistan's first ball

Follow Us
Close
Follow Us:
  • आशिया कप २०२५ सुपर-४ फेरीच्या सामन्यात भारताकडून पाकिस्तान पराभूत 
  • या सामन्यात सलामीवीर अभिषेक शर्माचा पहिल्याच चेंडूवर षटकार 
  • शाहीन शाह आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा अभिषेक शर्मा पहिलाच फलंदाज 

Abhishek Sharma created a record : आशिया कप २०२५(Asia cup 2025 )सुपर-४ फेरीच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. या स्पर्धेत भारताने दुसऱ्यांदा पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. सध्या, सुपर-४ फेरीत टीम इंडियाच्या विजयाचा नायक टी२० नंबर वन फलंदाज अभिषेक शर्मा ठरला. त्याने ३९ चेंडूंचा सामना करत ७४ धावांची स्फोटक खेळी करून भारताचा विजय सुकर केला.

हेही वाचा : Asia cup 2025 : IND vs PAK सामन्याने लिहिला नवा इतिहास! दुबईच्या मैदानावर विक्रमांचा पाऊस; एकदा वाचाच

पहिल्याच चेंडूवर लागवला षटकार

पाकिस्तानकडून भारतासमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारतीय संघासाठी डावाची सुरुवात केली. यामध्ये अभिषेक शर्माकडे स्ट्राईक होता. दरम्यान, शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तानसाठी पहिले षटकार टाकण्यासाठी आला. या दरम्यान, त्याने शाहीनच्या पहिल्याच चेंडूवर एक शानदार षटकार खेचला.

भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने शाहीन शाह आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एखाद्या फलंदाजाने शाहीन शाह आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आहे. अभिषेक शर्माने आधीच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर  दोन वेळा षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.

पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीबद्दल सांगायचे झाल्यास, तर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण ७० वेळा पहिले षटक टाकले आहे. परंतु, आतापर्यंत त्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कोणालाही  षटकार मारता आला नाही. परंतु अभिषेक शर्मा हा   पराक्रम करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

भारतीय संघाने या सामन्यात पाकिस्तानचा ६ विकेट्सने दणदणीत पराभव केला. पाकिस्तान संघासाठी हा मानहानिकरक  पराभव ठरला. तथापि, पाकिस्तानने चांगली फलंदाजी करत भारतासमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाकडून अभिषेकने सर्वाधिक ७४ धावांची स्फोटक खेळी केली. त्याने या खेळीत ६ चौकार आणि ५ षटकारांची बरसात केली.

हेही वाचा : Asia cup 2025 : ‘शाहीन आफ्रिदीचा फॉर्म खराब, त्याने आता ब्रेक घ्यावा..’, पाकिस्तानी माजी खेळाडूचा सल्ला

तर जोडीदार शुभमन गिलने २८ चेंडूमध्ये ४७ धावा केल्या. यामध्ये  त्याने ८ चौकार लगावले.  दोघांनी पहिल्या विकेटसाठी एकूण १०५ धावांची मोठी  भागीदारी केली. तिलक वर्माने देखील १९ चेंडूत २ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने नाबाद  ३० धावा काढल्या.

Web Title: Asia cup 2025 abhishek sharma hits historic six off afridis first ball

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • shaheen shah afridi

संबंधित बातम्या

IND vs PAK : आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये होणार धमाकेदार सामना, ‘नो हँडशेक’ वाद कायम राहणार का?
1

IND vs PAK : आज टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये होणार धमाकेदार सामना, ‘नो हँडशेक’ वाद कायम राहणार का?

Virat Kohli Birthday Special : ODI क्रिकेट इतिहासात ‘किंग’ कोहलीच्या ‘ त्या’ खास खेळी; ‘रन मशीन’ चे बिरुद लावणाऱ्या ठरल्या 
2

Virat Kohli Birthday Special : ODI क्रिकेट इतिहासात ‘किंग’ कोहलीच्या ‘ त्या’ खास खेळी; ‘रन मशीन’ चे बिरुद लावणाऱ्या ठरल्या 

IND vs PAK सामन्यांतील वादावर ICC चा मोठा निर्णय; Haris Rauf दोन सामन्यांसाठी निलंबित, सूर्यकुमारलाही दंड
3

IND vs PAK सामन्यांतील वादावर ICC चा मोठा निर्णय; Haris Rauf दोन सामन्यांसाठी निलंबित, सूर्यकुमारलाही दंड

IND vs PAK : 16 तारखेला भारताचा सामना होणार पाकिस्तानशी, रायझिंग स्टार्स आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर
4

IND vs PAK : 16 तारखेला भारताचा सामना होणार पाकिस्तानशी, रायझिंग स्टार्स आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.