Asia cup 2025 : 28 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप २०२५ चा (Asia cup 2025)अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा एक मोठा विक्रम करण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरुद्ध ३० पेक्षा जास्त धावा काढताच तो एक मोठा टप्पा गाठणार आहे. तो भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि पाकिस्तानच स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानला मागे टाकू शकतो.
हेही वाचा : Asia cup 2025 : भारताविरुद्ध पाकिस्तानचा निभाव लागणार नाही! ‘ही’ आहेत पाच कारणं; वाचा सविस्तर
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक सलग ३० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा रोहित शर्मा आणि मोहम्मद रिझवानसह संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. या तिन्ही फलंदाजांनी सलग सात डावांमध्ये ३० पेक्षा जास्त धावा करण्याची किमया साधली आहे. आता, अभिषेक शर्माने रोहित आणि रिझवानच्या विक्रमावर लक्ष असणार आहे.
अभिषेक शर्माने फेब्रुवारीपासून त्याच्या शेवटच्या सात डावांमध्ये किमान ३० धावा काढलेल्या आहेत. या कामगिरीची सुरवात इंग्लंडविरुद्धच्या त्याच्या सर्वोच्च टी-२० आंतरराष्ट्रीय धावसंख्ये १३५ ने झाली. वास्तविक पाहता त्याच्या १३५ च्या स्फोटक खेळीपूर्वी, अभिषेक शर्मा विश्वविक्रमाच्या अगदी जवळ जाऊन पोहोचला होता. त्याने यापूर्वी त्याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध फक्त २९ धावाच केल्या होत्या, ज्यामुळे त्याची सलग अर्धशतकांची मालिका खंडित झाली.
हेही वाचा : पाकिस्तानला धूळ चारण्यास भारताचे ‘हे’ खेळाडू सज्ज! एक तर आधीच करतोय कहर; वाचा सविस्तर
इंग्लंडनंतर, अभिषेकची आशिया कपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या आशिया कपमध्ये, अभिषेक शर्माने सलग सहा डावांमध्ये ३० पेक्षा जास्त धावा करण्याची किमया साधली आहे. ज्यात तीन अर्धशतकांचा देखील समावेश आहे. आता, आशिया कपच्या अंतिम फेरीत, त्याला इतिहासात पुन्हा प्रवेश करण्याची आणखी एक संधी चालून आली आहे. जर त्याने ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या तर तो सिकंदर रझा यांच्या सलग पाच अर्धशतकांच्या विक्रमाची बरोबरी साधू शकतो किंवा त्याला पिछाडीवर टाकू शकतो.
अभिषेक शर्माने मागील सात डावांमध्ये एकूण ४४४ धावा फटकावल्या आहेत. या धावा पुरुषांच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोणत्याही पूर्ण सदस्य देशाच्या खेळाडूच्या सर्वाधिक आहेत. तो आता स्वित्झर्लंडच्या फहीम नझीरच्या सर्वकालीन विक्रमापेक्षा (४५० धावा) केवळ सहा धावा दूर आहे. या काळात अभिषेक शर्माचा स्ट्राईक रेट देखील खूपच प्रभावीत करणारा आहे. त्याने २१६.५९ च्या स्ट्राईक रेटने धावा फटकावल्या आहेत.