भारतीय संघ(फोटो-सोशल मीडिया)
Asia cup 2025 final ind vs pak : आशिया कप(Asia cup 2025 )स्पर्धेतील सुपर ४ सामने संपले आहेत. काल श्रीलंका आणि भारत यांच्यात २६ सप्टेंबर रोजी शेवटचा सुपर ४ सामना खेळला गेला. सामन्यात भारताने श्रीलंकेचा सुपर ४ सामन्यात पराभव केला. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामन्यात महामुकाबला होणार आहे. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करताना दिसत आहे. भारत या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. भारताने सलग सहा सामने जिंकले आहेत. या मध्ये लीग टप्प्यात आणि सुपर ४ सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. आता भारत अंतिम सामन्यात देखील पाकिस्तान धूळ चारण्यास प्रयत्नशील असणार आहे. अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारताचे पाच खेळाडू पाकिस्तानल पराभूत करण्यात मोठी कामगिरी बाजावू शकतात. याबाबत आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : IND vs SL: कुलदीप यादवने वाढवली पाकिस्तानची चिंता! अंतिम सामन्यापूर्वी रचला मोठा इतिहास; वाचा सविस्तर
१) शुभमन गिल
भारताचा भरवशाचा फलंदाज शुभमन गिलने आतापर्यंतच्या सहा आशिया कप सामन्यांमध्ये एकूण ११५ धावा फटकावल्या आहेत. तो एकदा नाबाद राहिला आहे. या मालिकेत त्याची सर्वोच्च धावसंख्या ४७ इतकी राहिली आहे. तथापि, पाकिस्तानसारख्या प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी गिलचे चालणे महत्वाचे असणार आहे. जर पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात शुभमन गिलच्या बॅटने आग ओकली तर भारताचा विजय कोणीही रोखू शकणार नाही.
२) अभिषेक शर्मा
पहिल्या क्रमांकावर आहे, धडाकेबाज भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा. त्याने या संपूर्ण स्पर्धेत आपल्या फलंदाजीने कहर केला आहे. तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. सहा सामन्यात ६ डावांमध्ये, अभिषेक शर्माने ५१.५० च्या सरासरीने ३०९ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ७५ इतकी आहे. जर त्याने पाकिस्तानविरुद्ध हा फॉर्म असाच सुरू ठेवला तर भारताचे चॅम्पियन होणे अटळ आहे.
३) सूर्यकुमार यादव
भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव टी-२० मध्ये त्याच्या असाधारण फटक्यांसाठी प्रसिद्ध आहे. तथापि, त्याने या स्पर्धेत आतापर्यंत समाधानकारक फलंदाजी केलेली नाही. सहा सामन्यांच्या पाच डावांमध्ये तो २३.६६ च्या सरासरीने केवळ ७१ धावाच करू शकला आहे. ज्याचा सर्वोच्च धावसंख्या ४७ इतकी आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या सामन्यात सूर्यकुमार यादवची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.
४) संजू सॅमसन
भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज संजू सॅमसन आशिया कपमध्ये चांगल्या लयीत दिसत आहे. आतापर्यंतच्या सहा आशिया कप सामन्यांमधील तीन डावांमध्ये, त्याने ३६ च्या सरासरीने १०८ धावा फटकावल्या आहेत. ज्याची सर्वोच्च धावसंख्या ५६ ही आहे. जर त्याने पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामन्यात हीच गती कायम ठेवली तर भारताला कोणतीही अडचण जाणवणार नाही.
हेही वाचा : वैभव सूर्यवंशीचा पाकिस्तानच्या बाबर आझमला धोबीपछाड! युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये रचला ‘हा’ इतिहास
५) हार्दिक पंड्या
आशिया कपमध्ये यावेळी भारतीय संघाचा भरवशाचा मानला जाणारा खेळाडू हार्दिक पंड्याची धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. पाकिस्तानविरुद्धचा अंतिम सामन्यात पंड्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. पांड्याने आशिया कपच्या सहा सामन्यांमध्ये चार डावांमध्ये फक्त १६ च्या सरासरीने फक्त ४८ धावा करू शकला आहे. ज्याचा सर्वोच्च धावसंख्या ३८ इतकी आहे. जर अष्टपैलू पंड्याच्या बॅटने या अंतिम सामन्यात चांगली कामगिरी केली, तर भारतीय संघ आशिया कपचे जेतेपद जिंकण्यास काही एक अडचण येणार नाही.