Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025 : गौतम गंभीरची १५ वर्षांनंतर ‘ती’ इच्छा पूर्ण होईल का? आशिया कपमधील हेड कोचची आकडेवारी काय सांगते? 

 ९ सप्टेंबरपासून खेळवण्यात येणाऱ्या आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे. त्याने खेळाडू म्हणून तीन आशिया कप खेळले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 28, 2025 | 05:42 PM
Asia Cup 2025: Will Gautam Gambhir's 'wish' come true after 15 years? What do the head coach statistics in the Asia Cup say?

Asia Cup 2025: Will Gautam Gambhir's 'wish' come true after 15 years? What do the head coach statistics in the Asia Cup say?

Follow Us
Close
Follow Us:

Asia cup 2025 : आशिया कप स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच करून झाली आहे. १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले आहेत. या स्पर्धेत भारतीय संघ हा विजेतेपदाचा प्रमुख दावेदार मानण्यात येत आहे. भारत आपल्या मोहिमेला १० सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध खेळून सुरुवात करणार आहे. यावेळी आशिया कप टी-२० स्वरूपात खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा भारतीय खेळाडूंसह भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसाठी देखील महत्वाची असणार आहे. तो मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिल्यांदाच या स्पर्धेला सामोरा जाणार आहे. गौतम गंभीरने तीन वेळा आशिया कप स्पर्धेत भाग घेतला आहे. या दरम्यान तो एकदा चॅम्पियन देखील बनला आहे.

हेही वाचा : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराने आखले नवे प्लॅन! BCCI साठी पार पाडू शकतो ‘ही’ जबाबदारी

गंभीरची आशिया कपमधील कामगिरी कशी राहिली आहे?

हेड कोच गौतम गंभीरने आशिया कपमध्ये फलंदाज म्हणून शानदार कामगिरी केली आहे. गंभीरने या स्पर्धेत ३ वेळा भाग घेतला आहे. तो पहिल्यांदा २००८ मध्ये आशिया कपमध्ये खेळला होता, जिथे त्याने ६ सामन्यांमध्ये ४३ पेक्षा अधिक सरासरीने २५९ धावा फटकावल्या होत्या.  तथापि, त्याच्या दमदार कामगिरीने टीम इंडियाला ही स्पर्धा जिकवून देऊ शकला नाही. अंतिम सामन्यात, भारतीय संघ अजंता मेंडिसच्या गोलंदाजी समोर टिकू शकला नाही. परिणामी अंतिम सामन्यात भारताचा १०० धावांनी पराभव झाला.

त्यानंतर  २०१० च्या आशिया कपमध्ये देखील गौतम गंभीरने अजून चांगली  कामगिरी करून सर्वांना प्रभावित केले होते. त्याने ४ सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरीने २०३ धावा काढल्या होत्या. अंतिम सामना श्रीलंकेविरुद्ध होता आणि टीम इंडियाने दांबुलामध्ये ८१ धावांनी दणदणीत  विजय मिळवला होता. २०१२ च्या आशिया कपमध्ये मात्र गौतम गंभीरने ३ सामन्यांमध्ये १११ धावा काढून देखील पण संघ अंतिम फेरीतही पात्र ठरण्यास यशस्वी झाला नाही.

हेही वाचा : Duleep Trophy 2025 स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंचा लागणार कस! दमदार कामगिरीवर असणार भर

२०२५ च्या आशिया कपमध्ये चित्र बदलणार?

गौतम गंभीर २०१० मध्ये झालेल्या आशिया कपमध्ये एक खेळाडू म्हणून आशिया चषक विजेता ठरला होता.  आता १५ वर्षांनंतर, गौतम गंभीर संघाचा प्रशिक्षक म्हणून आशिया कप जिंकणार का? याकडे सर्वांच्या नजरा असणार आहे.  आशिया कप २०२५ चे सर्व सामने दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत.

Web Title: Asia cup 2025 gautam gambhirs statistics in asia cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 05:42 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Gautam Gambhir
  • Team India

संबंधित बातम्या

IND VS PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात मुस्लिम क्रिकेटपटू टार्गेट का? मोहम्मद शमीच्या उत्तराने घेतला चाहत्यांच्या मनाचा ताबा
1

IND VS PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात मुस्लिम क्रिकेटपटू टार्गेट का? मोहम्मद शमीच्या उत्तराने घेतला चाहत्यांच्या मनाचा ताबा

पृथ्वी शॉ कोणाला डेट करत आहे? गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ही ‘महिला’ दिसली त्याच्यासोबत ; Photo Viral
2

पृथ्वी शॉ कोणाला डेट करत आहे? गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ही ‘महिला’ दिसली त्याच्यासोबत ; Photo Viral

Asia Cup 2025 : India vs Pakistan सामन्याबाबत सोनी स्पोर्ट्सच्या प्रोमोवरून गोंधळ, सेहवागवरही क्रिकेट प्रेक्षकांनी साधला निशाणा
3

Asia Cup 2025 : India vs Pakistan सामन्याबाबत सोनी स्पोर्ट्सच्या प्रोमोवरून गोंधळ, सेहवागवरही क्रिकेट प्रेक्षकांनी साधला निशाणा

Asia Cup 2025: आशिया कपमधील हे ५ मोठे विक्रम मोडणे अशक्य; यादीत ३ भारतीय खेळाडूंचा दबदबा
4

Asia Cup 2025: आशिया कपमधील हे ५ मोठे विक्रम मोडणे अशक्य; यादीत ३ भारतीय खेळाडूंचा दबदबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.