Asia Cup 2025: Who is the 'uncle' of the Indian team? Anyone who has an eye on 'this' in the Asia Cup, read it once..
Asia cup 2025 : आजपासून म्हणजे ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ (Asia cup 2025 )स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या वेळी आशिया कप टी २० स्वरूपात खेळवला जाणार आहे. हाँगकाँग वि अफगाणिस्तान यांच्यात सलामीची लढत होणार आहे. या स्पर्धेसाठी सूर्यकूमार यादवकडे भारतीय संघाचे नेतृत्व देण्यात आले. अशातच भारतीय खेळाडूंकडे या स्पर्धेत खास लक्ष्य असणार आहे. भारतीय संघात एक ‘काका’ खेळाडू आहे. ज्याची नजर आशिया कपमध्ये १२.५० लाख रुपयांवर असणार आहे. हा ‘काका’ खेळाडू कोण आहे? याबाबत आपण माहिती घेऊया.
हेही वाचा : Asia cup 2025 च्या तोंडावर पाकिस्तानला धक्का! ‘या’ खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला राम राम..
भारतीय संघात काका खेळाडू कोण? तर शुभमन गिल(Shubman Gill)त्याचे नाव आहे. गिलचा काकाशी काय संबंध आहे? तर शुभमन गिलचे टोपणनाव काका आहे. ज्याबद्दल त्याने ‘बिहाइंड द सीन्स विथ शुभमन गिल’ नावाच्या एका कार्यक्रमामध्ये माहिती दिली होती. या शोमध्ये गिलने म्हटले होते की, त्याचं टोपणनाव काका आहे. ज्याचा पंजाबी भाषेत अर्थ बाळ असा होतो. त्यामुळे भारतीय संघात शुभमन गिलला काका म्हणून ओखले जाते हे आता स्पष्ट झाले आहे.
शुभमन गिलने इंग्लंड दौऱ्यात शानदार कामगिरी केली आहे. आता त्याचे लक्ष्य आता आशिया कपकडे लागून आहे. टो शानदार फॉर्ममध्ये आहे. गिल आशिया कपमध्ये गेम चेंजर खेळाडू ठरू शकतो. त्याचे लक्ष १२.५० लाख रुपयांवर असणार आहे. त्याची फलंदाजीची शैली सर्वोत्तम मानली जाते. तो फिरकी खेळण्यात देखील पटाईत आहे. आशिया कप २०२५ चे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले असून येथील खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी योग्य मानल्या जातात. अशा खेळपट्ट्यांवर, शुभमन गिल प्रभावी ठरू शकतो. अशा परिस्थितीत तो टीम इंडियाची नौका पार करू शकतो.
गिल त्याच्या फलंदाजीच्या जोरावर संघाला ९व्यांदा चॅम्पियन बनवण्याची क्षमता ठेवतो. हे करत असताना त्याकया बॅटमधून टो खोऱ्याने धावा काढेल असे बोलले जात आहे. भारताला विजेतपद मिळवून देत असताना जर तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला तर मात्र त्याला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात येईल, ज्याची किंमत १२.५० लाख रुपये इतकी असणार आहे.
भारतासाठी एक जमेची बाजू आहे ती म्हणजे गोष्ट म्हणजे शुभमन गिल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये उत्तम फलंदाजी करतो. त्याने नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिकेत सर्वाधिक ७०० पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या. तसेच या वर्षीच्या आयपीएलमध्ये त्याने १५ सामन्यांमध्ये ५० च्या सरासरीने ६५० धावा फटकावल्या होत्या.