इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए संघ(फोटो-सोशल मीडिया)
IND vs AUS : सप्टेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी मिळणार आहे. आजपासून आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुयावत होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंडिया ए टीम आशिया कप स्पर्धेदरम्यान मायदेशात ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध दोन हात करणार आहे. इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए यांच्यात 4 दिवसांचे 2 सामने खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर 3 अनऑफिशियल वनडे सामने देखील खेळवले होणार आहेत. या मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया ए टीमचा स्टार युवा खेळाडूला दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे.
हेही वाचा : US Open 2025 : यूएस ओपनमध्ये ‘९ सप्टेंबर’ चा अनोखा कारनामा! एकाच तारखेला तीन वेळा लिहिला गेला इतिहास
ऑस्ट्रेलिया ए टीमचा वेगवान गोलंदाज कॅलम विल्डर हा दुखापतीमुळे सर्व सामन्यांतून बाहेर पडला आहे. विल्डर स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे दौऱ्यातून बाहेरचा रस्ता धरावा लागला आहे. विल्डरआधी ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंनया देखील दुखापतीचे ग्रहण लागले त्यामुळे टेस्ट सीरिजमधून बाहेर व्हावं लागलं आहे. दुखापत झालेल्या खेळाडूंमध्ये पॅट कमिन्स, ब्रॉडी काउच, आणि लान्स मॉरिस यांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियन स्टार युवा खेळाडू “कॅलम विल्डर याला सरावादरम्यान पाठीत त्रास जाणवू लागला होता. विल्डरकडून त्याला होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली. त्यानंतर विल्डरच्या आवश्यक चाचण्या केल्या गेल्या. त्यामध्ये त्याला स्ट्रेस फॅक्चर असल्याची माहिती समोर अली आहे. त्यामुळे विल्डरला पूर्णपणे फिट होण्यासाठी बऱ्याच कालावधी लागणार आहे. विल्डर दुखापतीतून सावरल्यानंतर रिहबॅला सुरुवात करणार आहे. करेल”, अशी माहिती ईसपीएन क्रिकइन्फोने क्विसलँडचे हाय परफॉर्मन्स अधिकारी जो डावेस यांच्या हवालव्याने देण्यात आली आहे.
तसेच विल्डर व्यतिरिक मॉरिस आणि काउच या दोघांना देखील दुखापतीमुळे मल्टी डे सीरिजमध्ये खेळणे शक्य होणार नाहीये. मॉरिसला दुखापतीमुळे क्रिकेटपासून 1 वर्ष दूर रहावं लागणार आहे. तर काउचला साईड स्ट्रेनमुळे बाहेर जाव लागत आहे. काउच शेफील्ड शील्ड स्पर्धेपर्यंत फिट होणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 च्या तोंडावर पाकिस्तानला धक्का! ‘या’ खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला राम राम..
ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध इंडिया ए टीम मालिका
ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध इंडिया ए टीम यांच्यात 16 ते 25 सप्टेंबर दरम्यान 4 दिवसांचे 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर उभयसंघात 3 अनऑफिशियल एकदिवसीय सामने देखील खेळवले जाणार आहेत. या मालिकेला 30 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.