Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026: जपानच्या सुविधांवर BCCI नाराज? आशियाई स्पर्धेसाठी ‘B’ टीम पाठवणार; स्टार खेळाडूंना मिळणार विश्रांती

BCCI may send 'B' team to Asian Games Japan row: वृत्तानुसार, आशियाई खेळ सुरू होण्यापूर्वी जपानमधील क्रिकेट सुविधांबाबत बीसीसीआय असमाधानी आहे. त्यामुळे बीसीसीआय या खेळांसाठी टीम 'बी' पाठवण्याचा विचार करत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 28, 2026 | 02:10 PM
BCCI may send 'B' team to Asian Games

BCCI may send 'B' team to Asian Games

Follow Us
Follow Us:
  • जपानच्या व्यवस्थेवर BCCI नाखूश
  • आशियाई स्पर्धेसाठी ‘B’ टीम पाठवणार?
  • स्क्वॉडमध्ये मोठे बदल शक्य
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) जपानमधील सुविधांवर असमाधानी असल्याची माहिती समोर येत आहे. याच कारणामुळे बीसीसीआय आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ‘बी’ संघाला पाठवण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा जपानमधील आयची-नागोया येथे १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. पुरुषांची क्रिकेट स्पर्धा २४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान, तर महिलांची स्पर्धा १७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

Hockey World Cup 2026: १७ मिनिटं अन् जर्मनीचा गेम ओव्हर! भारताचा दणदणीत विजय; ५२ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी

बीसीसीआय आधी निरीक्षक पाठवणार

बीसीसीआयच्या एका सूत्राने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, जपानमध्ये क्रिकेटपटूंसाठी केलेल्या सुविधा आणि व्यवस्थेमुळे बीसीसीआय आणि एसीसी नाराज आहेत. यामुळे तेथे एक निरीक्षक पाठवण्याचा विचार करत आहेत. जर सुविधा अपुऱ्या असल्याचे आढळले, तर बीसीसीआय स्पर्धेसाठी ‘बी’ संघ पाठवण्याचा विचार करू शकते.

सूत्राने सांगितले की, ‘बीसीसीआय आणि एसीसी जपानमधील सुविधा आणि व्यवस्थेमुळे नाराज आहेत आणि बीसीसीआय तेथे एक निरीक्षक पाठवेल. तो आम्हाला त्याचा अहवाल सादर करेल आणि जर व्यवस्था अपेक्षेनुसार नसेल, तर आम्ही ‘बी’ संघ पाठवण्याचा विचार करू शकतो. आम्ही एसीसीच्या बैठकीदरम्यान जपानच्या ऑलिम्पिक अधिकाऱ्यांना सांगितले की, ड्रेसिंग रूम तंबूंमध्ये उभारण्यात आल्या आहेत आणि शौचालये त्या तंबूंपासून ५०० मीटर दूर आहेत, ज्यामुळे खेळाडूंसाठी असमाधानकारक परिस्थिती निर्माण होत आहे. शिवाय, हॉटेलच्या खोल्या खूपच लहान आहेत, ही एक मोठी चिंतेची बाब आहे.’

भारताने आशियाई खेळांसाठी जाहीर केला संघ

२०२३ मध्ये चीनच्या हांगझू येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले होते. या अंतिम सामन्यात पावसामुळे रद्द झाल्यानंतर चांगल्या मानांकनाच्या आधारावर भारताला विजेता घोषित करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने कर्णधार श्रेयस अय्यर, डावखुरे फलंदाज अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन आणि तिलक वर्मा ही आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व अर्शदीप सिंग यांचा समावेश असलेला एक मजबूत संघ जाहीर केला होता. भारतीय महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत असून, त्यात वरिष्ठ स्तरावर नियमितपणे खेळणाऱ्या अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. त्यामुले बीसीसीआय आता संघामद्ये बदल करणार तसेच स्टार खेळाडूंना विश्रांती देणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

आशियाई खेळांसाठी भारतीय पुरुष संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उप-कर्णधार), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, वैभव सूर्यवंशी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग.

Asia Cup 2026: आशिया कपसाठी ‘ब्लू ब्रिगेड’ सज्ज! हरमनप्रीतची ‘पलटण’ दुबईत दाखल; पाकिस्तानविरुद्ध महामुकाबला

Web Title: Asian games 2026 bcci may send b team japan cricket facilities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • asian games 2026
  • BCCI India
  • cricket marathi news
  • Team India Squad

संबंधित बातम्या

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट
1

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट

Asian Gamesच्या ‘सुवर्ण’वीरांना पंतप्रधान मोदींचे मोठे सरप्राईज; १५ ऑक्टोबरला थेट…
2

Asian Gamesच्या ‘सुवर्ण’वीरांना पंतप्रधान मोदींचे मोठे सरप्राईज; १५ ऑक्टोबरला थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.