Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार? Asian Games 2026 मध्ये महिला- पुरुष क्रिकेट संघाचे वेळापत्रक जाहीर

India-Pakista Match Schedule in Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 साठी क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर झाले असून भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत यजमान जपानविरुद्ध मोहिमेला सुरुवात करणार आहे. तर भारतीय पुरुष संघाने थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला असून भारत-पाकिस्तान सामना होण्याची शक्यता आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 24, 2026 | 06:28 PM
भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार? Asian Games 2026 मध्ये  महिला- पुरुष क्रिकेट संघाचे वेळापत्रक जाहीर
Follow Us
Follow Us:
  • भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार?
  • महिला- पुरुष क्रिकेट संघाचे वेळापत्रक जाहीर
  • पुरुष गटात भारत थेट उपांत्यपूर्व फेरीत
आची-नागोया २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धेची अधिकृत ड्रॉ गुरुवारी (दि. २३) जाहीर करण्यात आली. या ड्रॉमुळे गतविजेत्या भारताच्या पुरुष आणि महिला संघांच्या सामन्यांचे वेळापत्रक वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय महिला संघ आपला पहिला सामना यजमान जपानविरुद्ध खेळेल. टीम इंडिया आपल्या विजेतेपद डिफेन्ड करण्यासाठी मैदानात उतरेल. तर पुरुष संघाने मानांकनाच्या आधारावर थेट उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.

Cricket News: T20 क्रिकेटमध्ये जोस बटलरचा दबदबा; ख्रिस गेलचा महारिकॉर्ड उद्ध्वस्त!

पुरुष गटात भारत थेट उपांत्यपूर्व फेरीत

पुरुषांच्या स्पर्धेतील गटात, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या चार देशांना अव्वल मानांकन मिळाल्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवला आहे. परंतु , त्यांचे प्रतिस्पर्धी अद्याप निश्चित झालेले नाहीत. उर्वरित चार जागा पात्रता फेरीतील सामन्यांद्वारे ठरवल्या जातील. ‘अ’ गटामध्ये अफगाणिस्तान, जपान आणि नेपाळ यांचा समावेश आहे, तर ‘ब’ गटामध्ये हाँगकाँग, चीन, मलेशिया आणि ओमान यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील आणि मानांकित संघांशी सामना करतील.

भारत- पाकिस्तान सामना रंगणार?

याचा अर्थ असा की, प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध फक्त एकच सामना खेळू शकतात, तोही उपांत्य फेरीत किंवा अंतिम सामन्यात. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना प्राथमिक फेरीत होणार नाही. हे दोन्ही संघ उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत पोहोचल्यास एकमेकांसमोर येतील.

पुरुषांची स्पर्धा २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली जाईल. सर्व सामने आयची प्रांतातील कोरोगी ॲथलेटिक पार्क येथे टी२० फॉरमॅटमध्ये खेळले जातील आणि त्यांना पूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जा असेल. संघाची कमान श्रेयस अय्यरच्या हातात असेल तर तिलक वर्मा उपकर्णधार भूमिकेत असेल. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचाही १५ सदस्यीय पुरुष संघात समावेश आहे.

क्रिकेट चौथ्यांदा आशियाई खेळांचा भाग असेल. यापूर्वी २०१० ग्वांगझू, २०१४ इंचिओन आणि २०२३ हांगझू येथे क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. गेल्या वेळी भारताने पुरुष आणि महिला दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदके जिंकली होती.

जपानविरुद्ध महिला संघाचा पदार्पणाचा सामना

महिलांच्या गटातही भारताने उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पहिला सामना यजमान जपानविरुद्ध खेळेल. जर भारताने हा सामना जिंकला, तर उपांत्य फेरीत त्यांचा सामना बांगलादेश किंवा चीन यांच्यापैकी एकाशी होईल. दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात श्रीलंकेचा सामना मलेशियाशी, तर पाकिस्तानचा सामना थायलंडशी होईल.

आशियाई खेळ २०२६ पुरुष क्रिकेट वेळापत्रक

  • गट अ: अफगाणिस्तान, जपान, नेपाळ
  • गट ब: हाँगकाँग, चीन, मलेशिया, ओमान

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक

  • भारत विरुद्ध पात्रता फेरी
  • पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर
  • श्रीलंका विरुद्ध पात्रता फेरी
  • बांगलादेश विरुद्ध पात्रता फेरी

आशियाई खेळ २०२६ महिला क्रिकेट उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक

  • भारत विरुद्ध जपान
  • बांगलादेश विरुद्ध चीन
  • श्रीलंका विरुद्ध मलेशिया
  • पाकिस्तान विरुद्ध थायलंड
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती आणि वैभव सूर्यवंशी

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), जी. कमलिनी (विकेटकीपर), भारती फुलमाली, श्री चरणी, रेणुका ठाकुर, क्रांति गौड, अरुंधति रेड्डी, श्रेयंका पाटिल, राधा यादव आणि नंदनी शर्मा

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाला Virat Kohli चे समर्थन? व्हायरल ट्विटमुळे गोंधळ; सत्य आलं समोर

Web Title: Asian games 2026 cricket schedule india pakistan women men team fixtures

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • asian games
  • IND VS PAK
  • Womens cricket team

संबंधित बातम्या

IND vs PAK: 55 वर ऑल आउट तोरा तर…! बाद करून दाखवला माज! फातिमा सनावर ICC ची कडक कारवाई
1

IND vs PAK: 55 वर ऑल आउट तोरा तर…! बाद करून दाखवला माज! फातिमा सनावर ICC ची कडक कारवाई

IND vs PAK: आशिया कपमध्ये पुन्हा ‘महामुकाबला’! भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार? पाहा संपूर्ण समीकरण
2

IND vs PAK: आशिया कपमध्ये पुन्हा ‘महामुकाबला’! भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार? पाहा संपूर्ण समीकरण

Women’s Asia cup 2026: पाकिस्तानचा खेळ खल्लास! आता कोणाचा गेम करणार? सेमीफायनलमध्ये भारताचा ‘या’ संघाशी होणार महामुकाबला
3

Women’s Asia cup 2026: पाकिस्तानचा खेळ खल्लास! आता कोणाचा गेम करणार? सेमीफायनलमध्ये भारताचा ‘या’ संघाशी होणार महामुकाबला

एक डाव, दोन वर्ल्ड रेकॉर्ड! Shafali Verma ने पाकिस्तानविरुद्ध केली ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी; २२व्या वर्षी दिग्गजांनाही टाकले मागे
4

एक डाव, दोन वर्ल्ड रेकॉर्ड! Shafali Verma ने पाकिस्तानविरुद्ध केली ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी; २२व्या वर्षी दिग्गजांनाही टाकले मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.