Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण कोरियात पुण्याचा डंका! जागतिक तायक्वांदो स्पर्धेत भारताची ३ सुवर्णांसह २० पदकांची कमाई

मुजू येथे झालेल्या वर्ल्ड तायक्वांदो कल्चर एक्सपो चॅम्पियनशिपमध्ये पूमसे आणि क्योरोगी प्रकारात खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. मंथन देवी आणि कृती दवे यांनी प्रत्येकी १ सुवर्ण व १ रौप्य पदकाची कमाई केली. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 30, 2026 | 03:58 PM
दक्षिण कोरियात पुण्याचा डंका! जागतिक तायक्वांदो स्पर्धेत भारताची ३ सुवर्णांसह २० पदकांची कमाई
Follow Us
Follow Us:
  • दक्षिण कोरियात होरांगी, फेलिक्सच्या खेळाडूंची पदकांची लयलूट
  • जागतिक तायक्वांदो स्पर्धेत ३ सुवर्ण, ९ रौप्य आणि ८ कांस्य पदकांची कमाई
  • खेळाडूंनी उंचावला भारताचा मान 
पुणे: दक्षिण कोरियातील मुजू येथे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड तायक्वांदो कल्चर एक्सपो चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसीई) तसेच इंचॉन येथे आयोजित वर्ल्ड ऑलिम्पिक तायक्वांदो फेडरेशन यांच्या स्पर्धांमध्ये पुण्यातील आर. बी. होरांगी तायक्वांदो दो-जांग असोसिएशन आणि सेंट फेलिक्स स्कूलच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत भारताचा (Sports) गौरव वाढविला. दोन्ही स्पर्धांमध्ये खेळाडूंनी मिळून ३ सुवर्ण, ९ रौप्य आणि ८ कांस्य अशी एकूण २० पदके जिंकत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

मुजू येथे झालेल्या वर्ल्ड तायक्वांदो कल्चर एक्सपो चॅम्पियनशिपमध्ये पूमसे आणि क्योरोगी प्रकारात खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. मंथन देवी आणि कृती दवे यांनी प्रत्येकी १ सुवर्ण व १ रौप्य पदकाची कमाई केली. आरवी गवारे हिने २ कांस्य पदके जिंकली, तर कल्याणी डफळ हिने १ सुवर्ण व १ कांस्य पदक पटकाविले. प्रांजल पानसे हिने १ रौप्य व १ कांस्य पदक मिळवत संघाच्या यशात मोलाची भर घातली. या स्पर्धेत संघाने एकूण ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य पदके जिंकली.

Pune Sports News: स्केट्सवर चिमुकल्यांचा जलवा! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त बालखेळाडूंची सुवर्ण कामगिरी

स्पर्धेत ६ रौप्य आणि ५ कांस्य पटकावले

यानंतर इंचॉन येथे झालेल्या वर्ल्ड ऑलिम्पिक तायक्वांदो फेडरेशनच्या स्पर्धेतही खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी कायम राखली. पूमसे आणि क्योरोगी प्रकारात मंथन देवी याने २ रौप्य पदके जिंकली. कृती दवे, आरवी गवारे, कल्याणी डफळ आणि प्रांजल पानसे यांनी प्रत्येकी १ रौप्य व १ कांस्य पदक मिळवत संघाच्या पदकसंख्येत भर घातली. या स्पर्धेत संघाने ६ रौप्य आणि ५ कांस्य पदके पटकाविली.

सर्व यशस्वी खेळाडूंचा सत्कार

या उल्लेखनीय यशाबद्दल सेंट फेलिक्स स्कूलतर्फे सर्व यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रोव्हिन्शियल सुपीरियर सिस्टर उर्सुला पिंटो, सिस्टर जेनिफर परेरा, स्कूल मॅनेजर सिस्टर रोझमेरी अल्मेडा, मुख्याध्यापिका लीना पॉल, सिस्टर एल्सा, पर्यवेक्षिका बेला डिसिल्व्हा, पीटी शिक्षिका सोनाली राजेभोसले तसेच रूपाली बनसोडे उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Inter-IT Football: ११-० चा धमाका! सायबेजच्या खेळाडूंचा मैदानात धुमाकूळ, डिलॉइट भुईसपाट

सायबेजच्या खेळाडूंचा मैदानात धुमाकूळ, डिलॉइट भुईसपाट

यू स्मॉल फायनान्स बँक प्रस्तुत १६ व्या आंतर आयटी फुटबॉल चॅम्पियनशिप कप २०२६ या प्रतिष्ठित स्पर्धेत साखळी फेरीत सायबेज संघाने आपला दबदबा कायम ठेवत डिलॉइट संघाचा ११-० असा धुव्वा उडवला. खराडी येथील टॉपप्ले फुटबॉल ग्राउंडवर सुरू असलेल्या या स्पर्धेत सायबेजच्या खेळाडूंनी चौफेर फटकेबाजी करत प्रतिस्पर्ध्यांना सावरण्याची एकही संधी दिली नाही.

Web Title: Athletes r b horangi taekwondo do jang association st felix school won 20 medals world taekwondo championship pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • gold medal
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

Air Pollution: प्रदूषणाचा ‘डिलेड अटॅक’! दिल्लीत हवामानातील बदलांचा फटका ५१ तासांनंतर; IITM चा नवा खुलासा
1

Air Pollution: प्रदूषणाचा ‘डिलेड अटॅक’! दिल्लीत हवामानातील बदलांचा फटका ५१ तासांनंतर; IITM चा नवा खुलासा

Badminton: एकतर्फी संग्राम! ‘जेझ’ संघ ठरला १२ व्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन स्पर्धेचा ‘सुपर चॅम्पियन’
2

Badminton: एकतर्फी संग्राम! ‘जेझ’ संघ ठरला १२ व्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन स्पर्धेचा ‘सुपर चॅम्पियन’

Chess Olympiad: उझबेकिस्तानमध्ये बुद्धिबळाचा महासंग्राम! अव्वल ग्रँडमास्टर जवोखिर सिंधारोवकडे मशाल सुपूर्द
3

Chess Olympiad: उझबेकिस्तानमध्ये बुद्धिबळाचा महासंग्राम! अव्वल ग्रँडमास्टर जवोखिर सिंधारोवकडे मशाल सुपूर्द

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल
4

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.