Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs BAN: उलटा पडला डाव! बांग्लादेशी ठरले वरचढ, 29 धावातच ऑस्ट्रेलियाचे 4 गडी बाद, झाली दमछाक

Aus vs Ban: ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पुन्हा एकदा टीकेची धनी झाली आहे. दोन दशकांहून अधिक काळानंतर ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळणाऱ्या बांगलादेशी संघाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 13, 2026 | 10:17 AM
AUS vs BAN: पहिल्या दिवशीच संघाला पाजले पाणी (फोटो सौजन्य - X.com)

AUS vs BAN: पहिल्या दिवशीच संघाला पाजले पाणी (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • बांग्लादेशने ऑस्ट्रेलियाला आणले अडचणीत 
  • नाहिद राणा, मुस्तफिजुर रहमान आणि शोरिफुल इस्लाम यांच्या अनुपस्थितीत खेळताना बांगलादेशने दुपारच्या जेवणापर्यंत ऑस्ट्रेलियाला ७४/४ अशा स्थितीत आणले
  • कमकुवत समजणे पडले महागात 
AUS vs BAN: दोन दशकांहून अधिक काळानंतर ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेची इतकी निराशाजनक सुरुवात होईल, याची बांगलादेशनेच काय तर अगदी जगाच्या कोणत्याही टीमने कधी कल्पनाही केली नसेल. ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागातील डार्विन येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी, बांगलादेशने दुपारच्या जेवणापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या चार महत्त्वाच्या विकेट्स ७४ धावांत आपल्या खिशात टाकल्या आहेत. बांगलादेशी संघ आपल्या प्रमुख वेगवान गोलंदाजांशिवाय मैदानात उतरला होता. यामुळे अनेकांना वाटत होते की, बांग्लादेशाची कामगिरी निराशाजनक होईल. मात्र हा डाव उलटाच पडला असल्याचं दिसून येत आहे. 

AUS vs BAN: 23 वर्षाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर ऑस्ट्रेलियात लागणार बांग्लादेशच्या खेळाडूंची ‘कसोटी’, कुठे पाहता येणार Live Streaming

पहिली विकेट ४५ धावांवर, तर चौथी ७४ धावांवर पडली

नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला गोलंदाजी करण्यास सांगितले. पाहुण्या संघाच्या वेगवान गोलंदाजांनी सलामीवीर हसन महमूदच्या साथीने कांगारूंच्या आघाडीच्या फळीला खिंडार पाडले. पहिला बळी घेणाऱ्या हसन महमूदने सलामीवीर जेक वेदरॉल्डला बाद केले, पण त्यानंतर संघ नियमित अंतराने विकेट्स गमावत राहिला. वेदरॉल्ड ३७ चेंडूंमध्ये २३ धावांवर बाद झाला, त्यामुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ११.४ षटकांत ४५ झाली. पण त्यानंतरच्या २९ धावांत ऑस्ट्रेलियाने चार विकेट्स गमावल्या.

हेड, लॅबुशेन आणि ग्रीन, सर्व महारथी झाले बाद 

गेल्या मोसमात इंग्लंडविरुद्धच्या ॲशेस मालिकेत खराब फॉर्म असूनही जेक वेदरॉल्डला संघात कायम ठेवण्यात आले होते, पण त्याला आपल्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आले नाही. ट्रॅव्हिस हेडच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला. हसन महमूदने अवघ्या दोन षटकांत हेडला क्लीन बोल्ड केले. हेडने ३९ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. संघ या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मार्नस लॅबुशेन, २० चेंडूंमध्ये १ धाव काढून इबादत हुसेनचा पहिला बळी ठरला. दुपारच्या जेवणापूर्वी, कॅमेरॉन ग्रीन १३ चेंडूंमध्ये १३ धावा करून तस्किन अहमदचा दुसरा बळी ठरला.

Ajinkya Rahane: निवृत्तीनंतर काही दिवसातच मिळाली दुसरी नोकरी, आता अजिंक्य रहाणे दिसणार ‘या’ रुपात

स्टीव्ह स्मिथची एकट्याची लढाई 

ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीचा कणा असलेला माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, २५ चेंडूंमध्ये सात धावांवर नाबाद आहे. यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरी आणि ब्यू वेबस्टर हे पुढील फलंदाज आहेत. कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क हे देखील चांगली फलंदाजी करू शकतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे. वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडच्या जागी हेझलवूडचा संघात समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलिया बांग्लादेशी पेसरपुढे नक्की कसा तग धरणार पहावे लागेल आणि इतकंच नाही तर पुढे बांग्लादेशचे खेळाडू कशा पद्धतीने मैदानात लढा देणार हेदेखील पहावे लागेल. 

Web Title: Aus vs ban first test till lunch bangladesh pacers super show australia lost 4 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • australia vs bangladesh
  • cricket news
  • Test Match

संबंधित बातम्या

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
1

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी
2

पुण्यात टी-२० क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ ३ संघांनी मारली बाजी

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
3

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

IND vs JPN: भारत आणि जपान ऐतिहासिक सामन्यासाठी तयार, मात्र पावसाने केला खोळंबा; थोड्याच वेळात होणार निरीक्षण
4

IND vs JPN: भारत आणि जपान ऐतिहासिक सामन्यासाठी तयार, मात्र पावसाने केला खोळंबा; थोड्याच वेळात होणार निरीक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.