Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs WI : WTC पॉईंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाची विजयी सुरुवात! वेस्ट इंडीजला 159 धावांनी केलं पराभुत

ऑस्ट्रेलियाच्या संघाने या विजयासह ऑस्ट्रेलियाने केवळ WTC पॉइंट्स टेबलमध्ये आपले खाते उघडले नाही तर संघ पहिल्या स्थानावर पोहोचला. दुसऱ्या डावात कांगारू गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर कहर केला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 28, 2025 | 11:10 AM
फोटो सौजन्य – X (ICC)

फोटो सौजन्य – X (ICC)

Follow Us
Close
Follow Us:

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्याचा अहवाल : ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना काल संपला आहे, या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने तिसऱ्या डावामध्ये चांगली कामगिरी केली आणि पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यात यश मिळाले. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना बार्बाडोस येथे खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने हा सामना १५९ धावांनी जिंकला. या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा. 

ऑस्ट्रेलियाच्या संघाने या विजयासह ऑस्ट्रेलियाने केवळ WTC पॉइंट्स टेबलमध्ये आपले खाते उघडले नाही तर संघ पहिल्या स्थानावर पोहोचला. दुसऱ्या डावात कांगारू गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर कहर केला. एकाच सत्रात वेस्ट इंडिजच्या १० विकेट पडल्या.

दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ एकाच सत्रात १४१ धावांवर ऑलआउट झाला. वेस्ट इंडिजकडून फलंदाजी करताना शमार जोसेफने दुसऱ्या डावात सर्वाधिक ४४ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले. वेस्ट इंडिजचे ७ फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना जोश हेझलवूडने सर्वाधिक ५ बळी घेतले. याशिवाय, नॅथन लायनने २, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी १ बळी घेतला.

Australia win the opening Test at Kensington Oval.#WIvAUS | #FullAhEnergy pic.twitter.com/I1GR2t9Dlr

— Windies Cricket (@windiescricket) June 27, 2025

या सामन्यात विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे WTC पॉइंट टेबलमध्ये १२ गुण झाले आहेत. यापूर्वी इंग्लंडचा संघ १२ गुणांसह पहिल्या स्थानावर होता, कारण इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव केला होता. आता ऑस्ट्रेलिया इंग्लंडला हरवून पहिल्या स्थानावर आला आहे. याशिवाय बांगलादेश तिसऱ्या, श्रीलंका चौथ्या आणि भारत पाचव्या स्थानावर आहे. टीम इंडियाने WTC पॉइंट टेबलमध्ये अद्याप आपले खाते उघडलेले नाही.

IND vs ENG : हरमनची सेना इंग्लडविरुद्ध T20 मालिकेसाठी सज्ज! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार सामन्याची लाइव्ह स्ट्रिमिंग

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी चांगली होती. त्यामुळे संघाने ३१० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना दुसऱ्या डावात ३ फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. यामध्ये ट्रॅव्हिस हे ६१, ब्यू वेबस्टर ६३ आणि अ‍ॅलेक्स केरी ६३ धावांचा समावेश होता. याशिवाय मिचेल स्टार्कने १६ धावांची खेळी केली. 

Web Title: Aus vs wi australia makes a winning start in the wtc points table defeats west indies by 159 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 10:43 AM

Topics:  

  • Aus vs WI
  • cricket
  • Sports

संबंधित बातम्या

Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ
1

Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
2

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर
3

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी
4

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.