ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर मिळवला मोठा विजय (फोटो- सोशल मिडिया)
ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर मिळवला मोठा विजय
एकदिवसीय मालिकेत 2-0 ने घेतली आघाडी
तबल 90 धावांनी वेस्ट इंडिजचा केला पराभव
Australia Vs West Indies: सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज महिला संघांमध्ये एकदिवसीय मालिका सुरू आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला संघात तीन सामन्यांची मालिका सुरू आहे. तर आजच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने वेस्ट इंडिज संघाचा दारुण पराभव केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या सामन्यात 90 धावांनी पराभव केला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या संघाने वेस्ट इंडिजचा पराभव केल्याने आता ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय सामन्यात 2-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघाने एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या संघाला 270 धावांचे लक्ष्य दिले होते. त्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाला केवळ 179 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या संघाचा 90 धावांनी पराभव केला. तसेच 3 सामन्यांच्या मालिकेत देखील विजयी आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियन संघाला मिळाली नवी कर्णधार! Alyssa Healy ची जागा घेणार ही खेळाडू, भारताविरुद्ध संघ जाहीर
सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क मैदानावर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा ९० धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी मिळवून मालिका आपल्या नावावर केली आहे. जॉर्जिया वेअरहॅम या सामन्याची खरी स्टार ठरली. तिने फलंदाजी करताना उपयुक्त 39 धावा केल्या आणि गोलंदाजीमध्ये 30 धावा केल्या आणि तीन विकेट्स घेतल्या.
सलामीवीर बेथ मुनीने १०४ चेंडूत ६५ धावांची खेळी करून ऑस्ट्रेलियाला भक्कम धावसंख्या उभारून देण्यात मोठी भूमिका बजावली. ॲशले गार्डनरने ३४ धावांत ३ बळी घेतले, तर ताहलिया मॅकग्राने फक्त १५ धावा देऊन २ बळी घेत विंडीजच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. वेस्ट इंडिजकडून कर्णधार हेली मॅथ्यूजने सर्वाधिक ४५ धावा केल्या, परंतु इतर फलंदाजांनी साथ न दिल्यामुळे त्यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
T20 World Cup 2026 आधी या स्टार खेळाडूला केले सस्पेंड! आयसीसीने या मोठ्या कारणासाठी केली कारवाई
ऑस्ट्रेलिया संघ: सोफी मोलिनेक्स (कर्णधार) अॅशले गार्डनर (उपकर्णधार), ताहलिया मॅकग्रा (उपकर्णधार) डार्सी ब्राउन, निकोला केरी, किम गार्थ, लुसी हॅमिल्टन, अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, बेथ मूनी (यष्टीरक्षक), एलिस पेरी,मेगन शुट, जॉर्जिया वॉल, जॉर्जिया वेअरहॅम, ताहलिया विल्सन






