Rohit Sharma Retirement: Captain Rohit Sharma will retire; Prediction of 'this' Australian legend..
Rohit Sharma : भारताने नुकतीच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला आहे. चॅम्पियन ट्रॉफीच्या विजयानंतर रोहित शर्माच्या निवृत्तीविषयी चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने देखील रोहित शर्माच्या निवृत्तीच्या विषयात उडी घेतली आहे. रिकी पाँटिंगने रोहितच्या निवृत्तीबाबत एक भाकीत केले आहे. चला तर रिकी पाँटिंग नेमकं काय म्हणाला ते बघूया.
ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पाँटिंगला विश्वास आहे, की रोहित शर्मा अजूनही एक मजबूत खेळाडू आहे. तसेच, तो 2027 मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचे नेतृत्व करण्यात सक्षम असून तो नेतृत्व करू शकतो असे पाँटिंगला वाटते.
भारतीय संघाने रोहितच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय विश्वचषक वगळता सर्व आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. पॉन्टिंग म्हणाला की, रोहित त्याच्या भविष्यातील आखणीबद्दल तसेच ध्येयांबद्दल पूर्णपणे स्पष्ट आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर पोहोचता तेव्हा प्रत्येकजण तुमच्या निवृत्तीची वाट पाहत असतो. हे का घडते? हे मला माहीत नाही. तेही जेव्हा तुम्ही त्याच्याप्रमाणे चांगले खेळत असता.
रोहित शर्मा म्हणाला होता की, ‘मी या फॉरमॅटमधून निवृत्त होणार नसून मला फक्त हे सांगायचे आहे की, यापुढे अशी कोणती अफवा पसरणार नाही. रिकी पॉन्टिंग म्हणाला की, मला असं वाटतं त्याच्या कर्णधारपदाखाली भारताला अंतिम वनडेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याला एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा अजून एक प्रयत्न करायचा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये त्याने ज्या प्रकारे शानदार खेळी केली आहे, त्यावरून त्याची काही चूक आहे. असे म्हणता येणार नाही.
हेही वाचा : Champion Trophy 2025 : हार्दिक पांड्याने मोडला किंग कोहलीचा विक्रम; केला ‘हा’ मोठा कारनामा..
रोहित शर्माने 2021 मध्ये भारतीय संघाची धुरा हातात घेतली होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने रविवारी (9 मार्च) दुबईत खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. या विजयाने भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावे केली. तसेच मागच्या वर्षी रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजमध्ये टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला 252 धावांचे आव्हान दिले होते. या सामन्यात कर्णधार रोहितने 83 चेंडूत 76 धावांची दमदार खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर भारताने सहज विजय संपदान केला होता. विजयानंतर रोहितकडून पत्रकार परिषदेमध्ये आपल्या निवृत्तीचे वृत्त फेटाळून लावण्यात आले होते.