Australian legendary batsman Steve Smith's Create Great Record In Test Cricket Scoring 10,000 runs and left Sachin behind in this matter
Australian Steve Smith’s Create Great Record : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आज स्टीव्ह स्मिथने एक धाव काढताच आपल्या नावावर एक विक्रम नोंदवत नवीन इतिहास रचला. कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा क्रिकेटपटू बनला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध त्याच्या कसोटी क्रिकेट १० हजार धावांवर नेल्या. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघ गॅलेमध्ये आमनेसामने आहेत. हा विक्रम नोंदवत स्मिथने सचिन तेंडुलकरला मागे टाकले.
स्मिथने रचला इतिहास
An exclusive club welcomes another member 👏
Well played, Steve Smith 🏏
More ➡️ https://t.co/t44tcMDKZX pic.twitter.com/dJRoa6n0FL
— ICC (@ICC) January 29, 2025
ऑस्ट्रेलियाच्या श्रीलंका दौऱ्यात रचला इतिहास
स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. श्रीलंका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करणाऱ्या स्मिथने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एक धाव घेऊन कसोटी क्रिकेटमध्ये आपले १०,००० धावा पूर्ण केल्या. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात त्याने ही कामगिरी केली. या कसोटीपूर्वी स्मिथला हा टप्पा गाठण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता होती. त्याने ऑफ स्पिनर प्रभाद जयसूर्याचा एक चेंडू घेऊन कसोटीतील आपले १०,००० धावा पूर्ण केल्या.
सचिन तेंडुलकरला टाकले मागे
उजव्या हाताचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ कसोटीत दहा हजार धावा करणारा जगातील १५ वा आणि ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला. याआधी ऑस्ट्रेलियाकडून अॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ आणि रिकी पॉन्टिंग यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडला होता. या काळात स्मिथने सचिन तेंडुलकरचा महान विक्रमही मोडला. कमीत कमी सामन्यांमध्ये १०,००० कसोटी धावा पूर्ण करणारा स्मिथ संयुक्तपणे जगातील दुसरा फलंदाज ठरला.
स्टिव्ह स्मिथचा मोठा विक्रम
STEVEN SMITH HAS THE 2ND BEST TEST AVERAGE WHILE REACHING 10,000 TEST RUNS. 🫡
– The GOAT of red ball cricket! 🐐pic.twitter.com/Ph0TJCg4u4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 29, 2025
या फलंदाजांनी केल्यात धावा
सर्वात कमी सामन्यांमध्ये १०,००० कसोटी धावा करण्याचा विक्रम विंडीजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराच्या नावावर आहे. लाराने १११ कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम केला होता तर सचिनने १२२ कसोटी सामन्यांमध्ये १० हजार धावांचा आकडा गाठला होता. स्मिथने त्याच्या ११५ व्या कसोटी सामन्यात १० हजार धावा केल्या आहेत, तर संगकारानेही ११५ कसोटी सामन्यांमध्ये हा विक्रम केला आहे.
५ जानेवारी रोजी स्मिथला त्याच्या १०,००० धावा पूर्ण करण्याची संधी होती, पण नंतर भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने त्याला या विक्रमापासून रोखले. भारताविरुद्धच्या सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात स्मिथ फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याच्या नावावर ९९९५ धावा होत्या. त्याला १० हजार धावा पूर्ण करण्यासाठी ५ धावांची आवश्यकता होती. पण जेव्हा स्मिथचा स्कोअर ४ होता तेव्हा प्रसिद्ध कृष्णाने त्याला यशस्वी जयस्वालकडून झेलबाद केले. अशाप्रकारे तो या टप्पा गाठण्यापासून एक धाव कमी राहिला.
सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये, इंग्लंडच्या जो रूटने सर्वाधिक धावा केल्या आहेत म्हणजेच १२९७२. रूट लवकरच द्रविड (१३२८८), जॅक कॅलिस (१३२८९) आणि रिकी पॉन्टिंग (१३३७८) यांना मागे टाकू शकतो.