
अफलातून! बॅट आहे की जादूची छडी; Karanbir Singh ची वादळी खेळी अन् Rohit Sharma चा 'तो' रेकॉर्ड उद्ध्वस्त
ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा कर्णधार आणि भारतीय वंशाचा स्फोटक फलंदाज करणबीर सिंग याने भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि हिटमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माचा जागतिक रेकॉर्ड मोडला आहे. त्या रेकॉर्डबाबत जाणून घेऊयात. करणबीर सिंग आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारा जगातील नंबर-१ चा फलंदाज म्हणून समोर अला आहे.
करणबीर सिंग ऑस्ट्रिया संघाचा कर्णधार आहे. त्याने हंगेरीविरुद्ध खेळताना रोहीत शर्माचा रेकॉर्ड मोडला आहे. हंगेरीविरुद्ध करणबीर सिंगने शानदार फलंदाजी केली आहे. त्याने 57 बॉलमध्ये 164 रन्सची आक्रमक खेळी केली आहे. या ऐतिहासिक खेळीमुळे त्याने रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला आहे. करणबीर सिंगने 18 फोर आणि 12 सिक्स मारले. त्याने रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला आहे.
नुसता राडा! ‘द वॉल’चा मुलगा गाजवतोय मैदान; Samit Dravid च्या फलंदाजीचा Video Viral
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने भारताला 2024 चा ति 20 वर्ल्ड कप जिंकवून दिला आहे. त्यानंतर रोहित शर्माने टी 20 फॉर्मटमधून निवृत्ती घेतली होती. रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीत 159 सामन्यांमध्ये 205 सिक्स मारले आहेत. खूळ कालावधीसाठी हा रेकॉर्ड त्याच्या नावावर होता . मात्र आता हा रेकॉर्ड करणबीर सिंगने मोडला आहे. आता त्याच्या नावावर 207 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. करणबीर सिंगने केवळ ६० सामन्यांच्या ५९ डावांतच २०७ षटकार ठोकून हा पराक्रम केला आहे. म्हणजेच रोहितच्या निम्म्यापेक्षा कमी डावांत त्याने हा जादुई टप्पा पार केला आहे.
Samit Dravid च्या फलंदाजीचा Video Viral
राहुल द्रविड हा भारताचा ‘द वॉल’ म्हणून ओळखला जातो. तसेच माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक देखील राहिलेला आहे. त्याच्या नेतृत्वर भारताने टी 20 वर्ल्डकप देखील जिंकला आहे. आता राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडने देखील आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांना चकित केले आहे. महाराजा ट्रॉफीमध्ये त्याने तूफान फलंदाजी केली आहे. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.