फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
KL Rahul to captain Delhi Capitals in IPL 2025 : आयपीएल २०२५ सुरू होण्यास फक्त ९ दिवस शिल्लक आहेत. ९ संघांनी त्यांच्या कर्णधारांची नावे जाहीर केली आहेत, परंतु दिल्ली कॅपिटल्स अजूनही कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली नव्हती, आता सोशल मीडियावर दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराची घोषणा करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद अक्षर पटेल सांभाळताना दिसणार आहेत. अक्षर पटेलने नुकतीच भारताच्या संघाने जिंकलेल्या चॅम्पियन ट्रॉफीचा भाग होता. यामध्ये त्याने कमालीची कामगिरी केली आहे.
अक्षर पटेल हा मागील सीझनमध्ये उपकर्णधार होता, आता फ्रँचायझीने स्टार अष्टपैलू अक्षर पटेलला संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे, जो गेल्या हंगामात संघाचा उपकर्णधार म्हणून खेळला होता. अक्षर २०१९ पासून दिल्ली संघासोबत आहे, ज्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज प्रमाणे आतापर्यंत एकही आयपीएल विजेतेपद जिंकलेले नाही.
A new era begins today 💙❤️ pic.twitter.com/9Yc4bBMSvt
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 14, 2025
गेल्या वर्षीच्या मेगा लिलावात दिल्लीने अक्षरला १८ कोटी रुपयांना कायम ठेवले होते. त्याच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्याने आतापर्यंत १५० सामन्यांमध्ये २१.४७ च्या सरासरीने आणि १३०.८८ च्या स्ट्राईक रेटने १६५३ धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटमधून तीन अर्धशतके आली.
गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत ७.२८ च्या इकॉनॉमी रेटने १२३ विकेट्स घेतल्या आहेत. या काळात, त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे २१ धावांत चार बळी घेणे. यावर्षी घरच्या मैदानावर झालेल्या टी-२० मालिकेत इंग्लंडविरुद्धच्या ४-१ अशा एकतर्फी विजयात अक्षर भारताचा उपकर्णधार होता. आयपीएल २०२५ मधील दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना २४ मार्च रोजी विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होईल. १७ मार्च रोजी विशाखापट्टणमला रवाना होण्यापूर्वी संघ या आठवड्यात नवी दिल्लीत तीन दिवसांचा एक छोटासा प्रशिक्षण शिबिर घेणार आहे.
संघ मालकाने केएल राहुलशी बोलले पण राहुलने संघाचे नेतृत्व करण्यास स्पष्टपणे नकार दिला. आता संघात फक्त दोनच खेळाडू उरले आहेत जे कर्णधारपदाची जबाबदारी घेऊ शकतात. २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परत येताच केएल राहुलने एक मोठा निर्णय घेतला. केएल राहुलने दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचा कर्णधार होण्यास नकार दिला. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने राहुलला कर्णधारपदाची ऑफर दिली होती, जी त्याने स्वीकारण्यास नकार दिला. दिल्ली कॅपिटल्स संघासमोर कर्णधार निवडण्याचे आव्हान आहे. तथापि, या शर्यतीत दोन नावे पुढे आहेत.