Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W Vs BAN W Live: बांग्लादेशने भारताविरुद्ध जिंकला टॉस; प्रथम करणार फलंदाजी

भारत आणि बांग्लादेशचा संघ आतापर्यंत 23 सामने खेळले आहेत. त्यामध्ये भारताचा संघ वरचढ ठरला आहे. भारताने बांग्लादेशविरुद्ध 23 पैकी तब्बल 20 सामने जिंकले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 25, 2026 | 06:37 PM
IND W Vs BAN W Live: बांग्लादेशने भारताविरुद्ध जिंकला टॉस; प्रथम करणार फलंदाजी
Follow Us
Follow Us:
  • हरमनप्रीत कौर करणार भारताचे नेतृत्व 
  • सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी भारताला विजय आवश्यक 
  • 6.30 वाजता होणार टॉस 
Indian W Vs Bangladesh W Live: इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आज अत्यंत महत्वाचा सामना होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ अन् बांग्लादेश महिला संघ आमनेसामने येणार आहेत. बांग्लादेशच्या संघाचे नेतृत्व निगर सुलताना आणि भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे. दरम्यान नुकताच टॉस पार पडला. बांग्लादेशने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजचा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, रिचा घोष, श्री चरणी, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर यांच्यावर भारतीय संघाची मदार असणार आहे. भारताने आतापर्यंत 3 पैकी सामने 2 सामने जिंकले आहेत. साऊथ आफ्रिकेविरुद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारताचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा प्रवास खडतर झाला आहे.

काय सांगतो हेड टू हेड रेकॉर्ड?

भारत आणि बांग्लादेशचा संघ आतापर्यंत 23 सामने खेळले आहेत. त्यामध्ये भारताचा संघ वरचढ ठरला आहे. भारताने बांग्लादेशविरुद्ध 23 पैकी तब्बल 20 सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचे पारडे मजबूत दिसून येत आहे. टी 20 वर्डकपमध्ये भारत आणि बांग्लादेशमध्ये 3 वेळेस आमनेसामने आले आहेत. तीनही सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे उद्याच्या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड दिसून येत आहे.

IND W Vs BAN W: उद्या करो या मरो! सेमीफायनलसाठी भारताला बांग्लादेशविरुद्ध विजय आवश्यक

मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा पराभव केला होता. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे उद्याचा सामना भारतीय संघाला उद्याचा सामना जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे उद्याचा सामना अत्यंत रोमांचक होण्याचा अंदाज आहे. सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धा सुरू आहे. भारतीय महिला संघ ग्रुप 2 मधून खेळत आहे. तीन पैकी दोन सामन्यात भारताने विजय प्राप्त केला आहे. तर कालच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र या तीनही सामन्यांमध्ये श्री चरणी या स्पिनरने अचूक अन् भेदक गोलंदाजी करत आपल्या नावावर नवा रेकॉर्ड केला आहे.

Shree Charani ची ऐतिहासिक कामगिरी; आयसीसी टी 20 वर्ल्डकपमध्ये नावावर केला ‘हा’ रेकॉर्ड

भारत: शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीकीपर), यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, क्रांती गौड, नंदनी शर्मा.

बांग्लादेशचा संघ:  जुआयरिया फिरदौस, दिलारा अख्तर, शर्मिन अख्तर, निगार सुलताना,शोभना मोस्तारी, शॉर्ना अख्तर, रितू मोनी, राबेया खातून, नाहिदा अख्तर, मारुफा अख्तर, संजिदा अख्तर मेगला

 

Web Title: Bangladesh women team won the toss and choose bat first against indian womens icc t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • ICC Women's T20 World Cup
  • IND VS BAN
  • Indian Women Cricket Team

संबंधित बातम्या

Women’s Asia Cup 2026: दुबईत थरार! ACC ने जाहीर केले स्पर्धेचे वेळापत्रक; भारताचा पहिला सामना कधी?
1

Women’s Asia Cup 2026: दुबईत थरार! ACC ने जाहीर केले स्पर्धेचे वेळापत्रक; भारताचा पहिला सामना कधी?

वाघिणी भिडण्यासाठी सज्ज! Women’s Asia Cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; मात्र ‘ही’ खेळाडू बाहेर
2

वाघिणी भिडण्यासाठी सज्ज! Women’s Asia Cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा; मात्र ‘ही’ खेळाडू बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.