भारतीय संघाने जिंकले गोल्ड मेडल (फोटो- ट्विटर)
Back-to-back #AsianGames gold 🇮🇳🥇 India’s men’s kabaddi team finish their #AichiNagoya2026 campaign on top, securing their 9th men’s kabaddi gold in Asian Games history. ✨ pic.twitter.com/LWukC5tzNu — Olympic Khel ™ (@OlympicKhel) September 26, 2026
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पुरुष कबड्डीच्या अंतिम सामन्यात भारत आणि इराण यांच्यात सुरुवातीपासूनच जबरदस्त आणि अटीतटीची टक्कर पाहायला मिळाली. पहिल्या मिनिटापासून दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी झुंज दिली. मात्र, उत्तरार्धात भारतीय खेळाडूंनी दाखवलेला संयम, आक्रमकता आणि अचूक रणनीतीच्या जोरावर इराणला धूळ चारत भारताने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
सामन्याच्या सुरुवातीला इराणच्या संघाने अत्यंत आक्रमक खेळ करत भारतीय संघावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी एका-एका पॉईंट्ससाठी संघर्ष करावा लागत होता. इराणने सुरुवातीला तगडे आव्हान दिले होते. पहिल्या हाफमध्ये इराणचा संघ १८-१७ असा अवघ्या एका पॉईंट्स पुढे होते.
भारताकडून चढाई करताना अर्जुन देशवालने अत्यंत वेगाने आणि चपळाईने इराणी डिफेंडर्सना चकवत महत्त्वाचे पॉईंट्स वसूल केले.सामन्याच्या अखेरच्या ६ मिनिटांमध्ये भारतीय संघाने महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर भारताने ही आघाडी कायम राखली आणि गोल्ड मेडलवर शिक्कामोर्तब केले.
बातमी अपडेट होत आहे…






