
महिला टी 20 वर्ल्ड कप मधील विसरून भारतीय महिला क्रिकेट संघ नव्या मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली आहे. हरमनप्रीत कौर कर्णधार असणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत ‘डिफेंडिंग चॅम्पियन’ म्हणून उतरणार आहे.
चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने श्रीलंकेचा पराभव करत गोल्ड मेडल जिंकले होते. आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आपले जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरताना दिसणार आहे. स्मृती मंधाना भारताची उपकर्णधार असणार आहे. दरम्यान बीसीसीआयने यास्तिकाच्या जागी जी. कमलिनी हिला संधी दिली आहे. तसेच श्रेयंका पाटीलचा देखील समावेश करण्यात आला आहे. मात्र तिच्या दुखापतीमुळे ती खेळणार कि नाही हे स्पष्ट होण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.
क्रिकेटविश्व हादरलं! Asian Games 2026 टीम इंडियाचे खेळाडू जाहीर? मात्र Suryakumar Yadav ला झटका
भारतीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, भारती फुलमाळी, नंदिनी शर्मा, ऋचा घोष, जी. कमलिनी, रेणुका ठाकूर, राधा यादव, अरुंधती रेड्डी, श्री चरणी, क्रांती गौड, श्रेयंका पाटील.
Suryakumar Yadav ला झटका
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 लवकरच सुरू होणार आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीच भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने 30 खेळाडूंची संभाव्य यादी जाहीर केली. आहे त्यात मोठा फेरबदल दिसून येत आहे. हा विषय नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.
या वर्षी 19 सप्टेंबरपासून जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होणार आहे. यासाठी बीसीसीआयने संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मात्र या टीममध्ये सूर्यकुमार यादवला स्थान देण्यात आलेले नाही. म्हणजेच या संघाचे सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून नेतृत्व करताना दिसून येणार नाहीये. त्यामुळे आशियाई खेळात सूर्याची कप्तानी आणि आक्रमक फलंदाजी चाहत्यांना पाहता येणार नाही.