सूर्यकुमार यादवला मोठा धक्का (फोटो- ians)
आशियाई खेळांमध्ये व्ही. व्ही. एस लक्ष्मण असणार हेड कोच
सूर्यकुमार यादव नाही करणार भारताचे नेतृत्व
अनेक नव्या खेळाडूंना देण्यात आली संधी
BCCI: सध्या भारतात आयपीएलचा हंगाम सुरू आहे. उद्या आयपीएल 2026 चा अंतिम सामना गुजरात आणि बंगळुरूमध्ये होणार आहे. दरम्यान याच वेळेस आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 लवकरच सुरू होणार आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीच भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने 30 खेळाडूंची संभाव्य यादी जाहीर केली. आहे त्यात मोठा फेरबदल दिसून येत आहे. हा विषय नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.
या वर्षी 19 सप्टेंबरपासून जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होणार आहे. यासाठी बीसीसीआयने संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मात्र या टीममध्ये सूर्यकुमार यादवला स्थान देण्यात आलेले नाही. म्हणजेच या संघाचे सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून नेतृत्व करताना दिसून येणार नाहीये. त्यामुळे आशियाई खेळात सूर्याची कप्तानी आणि आक्रमक फलंदाजी चाहत्यांना पाहता येणार नाही.
बीसीसीआयने 30 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआय भविष्यातील स्टार खेळाडू म्हणून वैभवकडे पाहत असून, जपानच्या मैदानावर त्याला आंतरराष्ट्रीय मंचावर चमकण्याची मोठी संधी मिळू शकते. त्याने आयपीएलमध्ये शानदार खेळी केली आहे. त्यामुळे वैभवला स्थान देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
भारताचे माजी दिग्गज फलंदाज आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही व्ही. एस लक्ष्मण हे आशियाई गेम्समध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. जून महिन्याच्या अखेरीस 30 पैकी खेळाडूंचा मुख्य संघ जाहीर केला जाऊ शकतो.
निवड झालेल्या ३० संभाव्य खेळाडूंमध्ये कोणाचा समावेश?
यशस्वी जायसवाल, रुतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, रिंकू सिंह, टिळक वर्मा, आयुष बडोनी, वैभव सूर्यवंशी, ऋषभ पंत, ईशान किशन, संजू सैमसन, ध्रुव जुरेल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, अभिषेक शर्मा, वाशिंगटन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, अनुकूल रॉय, शाहबाज अहमद, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, हर्ष दुबे, विप्रज निगम, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, खलील अहमद, यश ठाकूर.






