PBKS vs CSK: Despite being crowned 'King' against CSK, Punjab's player suffers setback! Disagreement with BCCI cost him dearly
PBKS vs CSK : काल ८ एप्रिल रोजी आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील २२ व सामना पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई संघाला पराभूत केले. चेन्नई सुपर किंग्सचा हा लागोपाठ चौथा पराभव ठरला आहे. अय्यरच्या पंजाबने हा सामना १८ धावांनी जिंकला आहे. सामन्यापूर्वी पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २१९ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात चेन्नई संघाला ५ गडी गामावत २०१ धावाच करता आल्या. या सामन्यादरम्यान पंजाबच्या मॅक्सवेलकडून झालेल्या एका कृतीचा त्याला चांगलाच फटका बसला आहे. बीसीसीआयकडून मॅक्सवेलवर दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ग्लेन मॅक्सवेलला त्याच्या मॅच फीच्या २५ टक्के दंड ठोठावला आहे.
तसेच दंडाव्यतिरिक्त, बीसीसीआयने मॅक्सवेलच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट देखील जमा केला आहे. मॅक्सवेलवर कलम २.२ अंतर्गत गुन्हा केल्याचा आरोप आहे. मॅक्सवेलने कलम २.२ अंतर्गत लेव्हल १ च्या गुन्ह्या कबुल केला आहे. जे मॅच रेफरीकडून लादण्यात आले होते.
आयपीएलने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्याद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. कलम २.२ हा बीसीसीआयच्या खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांसाठीच्या आचारसंहितेचा भाग असून ‘सामनादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, मैदानी उपकरणे किंवा फिक्स्चर आणि फिटिंग्जचा गैरवापर करण्याच्या विषयांवर आधारित आहे. तसेच कलम २.२ मध्ये सामान्य क्रिकेट क्रियाकलापांव्यतिरिक्त इतर कोणत्याही कृतीचा समावेश आहे, जसे की विकेट मारणे किंवा लाथ मारणे, आणि मुद्दामहून (म्हणजे जाणूनबुजून), बेपर्वाईने किंवा निष्काळजीपणे (दोन्ही प्रकरणांमध्ये जरी अपघाताने) जाहिरात फलक, सीमा कुंपण, ड्रेसिंग रूमचे दरवाजे, आरसे, खिडक्या आणि इतर फिक्स्चर आणि फिटिंग्जचे नुकसान करणारे कोणतेही कृत्य याचा यामध्ये समावेश आहे.
मॅक्सवेलवरद देखील अशाच वर्तनाचा आरोप करण्यात आला आहे. मॅक्सवेलने नेमकी कोणती चूक केली आहे? हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, हा निर्णय बंधनकारक असणार आहे. त्यामुळे त्याला त्याच्या मॅच फीच्या २५ टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.
मॅक्सवेल आयपीएल २०२५ च्या या हंगामात काही विशेष करू शकलेला नाही. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध फलंदाजी करताना त्याला केवळ १ धाव करता आली. गोलंदाजीत मात्र त्याने २ षटकांत ११ धावा देऊन रचिन रवींद्रची विकेट घेतली होती.