प्रीती झिंटा आणि प्रियांश आर्य(फोटो-सोशल मिडिया)
CSK vs PBKS : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामातील २२ व सामना काल मंगळवार ८ एप्रिल रोजी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई संघाचा पराभव केला. चेन्नई सुपर किंग्सचा हा सलग ४ था पराभव ठरला आहे. अय्यरसेनेने हा सामना १८ धावांनी आपल्या खिशात टाकला. सामन्यापूर्वी पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो किती योग्य होता हे पंजाबने दाखवून दिले. प्रियांश आर्यच्या दमदार शतकाच्या जोरावर पंजाब किंग्जने चेन्नईसमोर २१९ धावांचे लक्ष्य उभे केले. प्रतिउत्तरात चेन्नई संघाला ५ गडी गामावत २०१ धावाच करता आल्या. दरम्यान पंजाबच्या डाव सुरू असताना प्रियांशने शतक ठोकताच पंजाबची मालकीण प्रीती झिंटा खुश दिसून आली. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील व्हायरल हॉट आहे.
पंजाबविरूद्धच्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांच्या मर्यादा दिसून आल्या. पंजाबच्या फलंदाजांनी चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. चेन्नईकडून खलील अहमद आणि आर. यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. परंतु या दोन्ही गोलंदाजांची इकॉनॉमी प्रति ओव्हर १० पेक्षा जास्त धावा राहिली. तसेच नूर अहमद आणि मुकेश चौधरी यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.
Majestic is an understatement! 👍🏻💥
Gen Bold Star, #PriyanshArya complete his maiden #TATAIPL fifty in some style! 👊🏻
Watch the LIVE action ➡ https://t.co/tDvWovyN5c#IPLonJioStar 👉 PBKS 🆚 CSK | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/ViCDyXmIpd
— Star Sports (@StarSportsIndia) April 8, 2025
काल झालेल्या सामन्यात, पंजाब किंग्जकडून युवा सलामीवीर फलंदाज प्रियांशने दमदार शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने केवळ ३९ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. आयपीएल कारकिर्दीतील प्रियांश आर्यचे हे पहिले शतक आहे. यासोबतच, हे आयपीएल २०२५ मधील दुसरे शतक ठरले आहे. याआधी हैद्राबदचा खेळाडू इशान किशनने शतक ठोकले होते. प्रियांशच्या शतकानंतर, प्रीती झिंटा स्टेडियममधून टाळ्या वाजवताना दिसून आली. तिचा आनंद चेहऱ्यावर झळकत होता. आजच्या खेळीत त्याने प्रियांश आर्यने एकूण १०३ धावा केल्या. शतक पूर्ण करण्यासाठी त्याने केवळ ३९ चेंडू घेतले. प्रियांशला चेन्नई सुपर किंग्जचा फिरकी गोलंदाज नूर अहमदने तंबूत परत पाठवले. या धडाकेबाज डावखुऱ्या फलंदाजाने शशांक सिंगसोबत सहाव्या गड्यासाठी एकूण ७१ धावांची भागीदारी रचली.
हेही वाचा : Harmanpreet Kaur : श्रीलंकेत २७ पासून तिरंगी एकदिवसीय मालिकेचा थरार, हरमनप्रीत कौर सांभाळणार भारताची धुरा
आयपीएल २०२५ च्या लिलावामध्ये प्रीती झिंटाने प्रियांश आर्यला खरेदी करण्याचा रस दाखवला होता. आर्यला खरेदी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी यांच्यामध्ये स्पर्धा दिसून आली होती. परंतु, शेवटी प्रीती झिंटाने ही स्पर्धा जिंकली आणि आर्यला पंजाबच्या ताफ्यात सामील करून घेतले. पंजाब किंग्जने प्रियांश आर्यला एकूण ३.८० कोटी रुपयांना विकत घेतले. एकूणच आर्यची कामगिरी बघता प्रीती झिंटाने हिराच निवडला असे बोलले जात आहे.