Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहारने रणजी ट्रॉफी प्लेट ग्रुपच्या जेतेपदावर कोरले नाव! मणिपूरचा 568 धावांनी धुव्वा उडवून केली एलिट ग्रुपमध्ये दिमाखात एंट्री 

बिहारने बीसीसीआय-आयोजित रणजी ट्रॉफीचे प्लेट ग्रुपच्या विजेतेपद जिंकले आहे. २२ ते २६ जानेवारी दरम्यान खेळवण्यात आलेल्या या सामन्यात, बिहारने मणिपूरला ५६८ धावांनी धूळ चारून एलिट ग्रुपमध्ये प्रवेश केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 26, 2026 | 05:45 PM
Bihar has etched its name on the Ranji Trophy Plate Group title! They thrashed Manipur by 568 runs and made a grand entry into the Elite Group.

Bihar has etched its name on the Ranji Trophy Plate Group title! They thrashed Manipur by 568 runs and made a grand entry into the Elite Group.

Follow Us
Close
Follow Us:

Ranji Trophy Plate Group Final 2025-26: बिहारने बीसीसीआय-आयोजित रणजी ट्रॉफीचे प्लेट ग्रुपच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. बिहारने मणिपूरला ५६८ धावांनी धूळ चारून एलिट ग्रुपमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. पुढील हंगामापासून, बिहार रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये एलिट ग्रुपमध्ये खेळताना दिसणार आहे. या हंगामामध्ये बिहारने तिन्ही फॉरमॅटमध्ये शानदार कामगिरी केली आहे.

पाटण्यातील मोईनुल हक स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या रणजी ट्रॉफी प्लेट ग्रुपच्या अंतिम सामन्यात, बिहारने मणिपूरला ५६८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करून जेतेपद आपल्या खिशात टाकले आहे. २२ ते २६ जानेवारी दरम्यान खेळवण्यात आलेल्या या सामन्यात, बिहारने दोन्ही डावांमध्ये ५०० पेक्षा जास्त धावा उभ्या केल्या, मात्र  मणिपूर दोन्ही डावांमध्ये एकत्रितपणे ५०० धावांचा टप्पा पार करू शकला नाही.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : ‘संघाची घोषणा ही स्पर्धेत सहभागी….’, पाकिस्तान टी-20 विश्वचषकात खेळण्याबाबत मोहसिन नक्वी यांचे विधान

बिहारचा पहिला डाव

मणिपूरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु बिहारच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. कर्णधार साकिबुल गनीने पहिल्या डावात १०८ धावा केल्या, तर यष्टीरक्षक-फलंदाज विपिन सौरभने १४३ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. खालच्या क्रमावर फलंदाजी करताना सूरज कश्यपने ८३ धावा केल्या आणि   संघाला ५२२ धावांचा टप्पा गाठला. प्रत्युत्तरादाखल, मणिपूरचा पहिला डाव २६४ धावांवरच गडगडला आणि पहिल्या डावात २५८ धावांची मोठी आघाडी मिळाली.

बिहारचा दूसरा डाव

बिहारच्या दुसऱ्या डावात देखील फलंदाजांनी वर्चस्व राखले. संघाने आपला डाव  ६ बाद ५०५ धावांवर घोषित केला. सलामीवीर पियुष सिंगने ३२२ चेंडूत नाबाद २१६ धावांची संस्मरणीय खेळी साकारली. हे पियुषचे पहिले द्विशतक ठरले. तर खालिद आलमने ८१ धावा केल्या आणि रघुवेंद्र प्रताप सिंग ९० धावा केल्या.

हेही वाचा : IND vs NZ T-20 Series : श्रेयस अय्यरला लागली लॉटरी! संघातील स्थान राहणार कायम; तिलक वर्मा T20I मालिकेबाहेर

बिहारचा ५६८ धावांनी विजय

पहिल्या डावातील आघाडी मजबूत राखत बिहारने मणिपूरला विजयासाठी ७६४ धावांचे मोठे लक्ष्य दिले.  प्रत्युत्तरादाखल, मणिपूरचा दुसरा डाव देखील १९५ धावांवर गारद  झाला आणि परिणामी  ५६८ धावांनी पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या डावात बिहारच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी बजावली.  सूरज कश्यप आणि हिमांशू सिंग यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर प्रशांत सिंग यांनी दोन बळी घेतले. रघुवेंद्र प्रताप सिंग आणि आकाश विभूती राज यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. बिहारचा कर्णधार साकिबुल गनी यांना त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला तर मणिपूरचा फिरोइजाम जोतीन सिंग यांना मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. फिरोइजामने स्पर्धेत ३३५ धावा केल्या आणि १५ बळी घेण्याची किमया साधली.

Web Title: Bihar defeated manipur by 568 runs to win the ranji trophy plate group title

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • ranji trophy

संबंधित बातम्या

सरफराज खानने ठोकले भारतीय संघाचे दरवाजे! रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावत नावावर केला मोठा विक्रम
1

सरफराज खानने ठोकले भारतीय संघाचे दरवाजे! रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावत नावावर केला मोठा विक्रम

Ranji Trophy 2026 : सरफराज खानचे निवडकर्त्यांना ‘शतकी’उत्तर! रणजी ट्रॉफीमध्ये तळपली बॅट; वाचा सविस्तर 
2

Ranji Trophy 2026 : सरफराज खानचे निवडकर्त्यांना ‘शतकी’उत्तर! रणजी ट्रॉफीमध्ये तळपली बॅट; वाचा सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.