
काय म्हणाला कर्णधार श्रेयस अय्यर?
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला आहे. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने या पराभवावर स्पष्टीकरण दिले आहे. सामना सुरू होण्याआधी आम्ही योग्य रणनीती आखली होती. मात्र ती रणनीती मैदानात लागू करू शकलो नाही. 158 रन्स हा मोठा स्कोअर नव्हता. कालच्या सामन्यात आम्ही आमची योजना लागू करू शकला नाही.
श्रेयस अय्यरने फलंदाजीबाबत देखील भाष्य केले आहे. त्याने केलेल्या खेळीवर त्याने मत मांडले आहे. जर संघ जिंकला नाही तर माझी खेळी महत्वाची ठरत नाहीत. प्रत्येक सामन्यात चांगली खेळी करून भारताला विजय मिळवून देण्याची इच्छा आहे. मात्र यावेळेस असे झाले नाही. पुढील सामन्यात आम्ही अधिक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू.
‘Team India सारख्या शक्तिशाली…’; टी 20 सिरिज जिंकताच Harry Brook ने भारतीय संघाला डिवचले
Harry Brook ने भारतीय संघाला डिवचले
भारतासारख्या शक्तिशाली संघाला पराभूत करणे नेहमीच खास असते. कालच्या सामन्यात आम्ही अत्यंत चांगला खेळ केला. खेळाडूंनी पीचचा अंदाज घेतला असल्यामुळे चांगला खेळ केला. आमच्या संघाने विविध परिस्थितीमध्ये आपल्या कौशल्याचा चांगला वापर केला. त्यामुळे यांचा विजय सोपा झाला. कर्णधार हॅरी ब्रूकच्या नेतृत्वात इंग्लंडच्या संघाने चारही सामन्यात चांगली खेळी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
‘हा अपमान सहन..; Team India चा दारुण परभव होताच भडकले शशी थरूर, ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
हॅरी ब्रूकने तोंडभरून आपल्या गोलंदाजांचे कौतुक केले. आमच्या खेळाडूंमध्ये, गोलंदाजांमध्ये चांगला संवाद सुरू असतो. त्यामुळे यांचे प्रदर्शन अधिक चांगले होते, असे हॅरी ब्रूकने म्हटले. आमचा संघ शेवटचा सामना देखील जिंकला तर इंग्लंडचा संघ टी 20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्या नंबरवर पोहोचेल. जगातील एक नंबरची टीम होणे आमच्यासाठी गर्वाची बाब असणार आहे. मात्र आमचे लक्ष्य चांगले क्रिकेट खेळण्याकडे आणि सिरिज जिंकण्याकडे आहे.