
काल भारताने प्रथम फलंदाजी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने 80 रन्सची शानदार खेळी केली. अन्य फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून आले. प्रथम फलंदाजी करून भारताने इंग्लंडला 159 रन्सचे टार्गेट दिले होते. इंग्लंडच्या संघाने ते केवळ 1 विकेट गमावत पूर्ण केले. भारताने मालिका गमावली आहे.
शशी थरूर यांची पोस्ट काय?
कालचा सामना भारत हरल्यानंतर कॉँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या सोशल मिडिया पेजवर त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी इंग्लंडने मालिका जिंकल्याचा एक फोटो आहे. यामध्ये त्यांनी, ‘माझ्याकडे बोलायला काहीच नाहीये.
I’m truly speechless. Dumbfounded. Gobsmacked. This is one humiliation too many. There is literally nothing to be said. #INDvENG @BCCI @imAagarkar @GautamGambhir pic.twitter.com/bHPA4GHHGT — Shashi Tharoor (@ShashiTharoor) July 9, 2026
मला धक्का बसला आहे आणि मी संतप्त झालो आहे. हा अपमान सहन करण्यापलीकडचा आहे. खरे सांगायचे तर आता बोलण्यासारखे काहीच राहिलेले नाहीये.
नेटकऱ्यांच्या कमेंट काय?
शशी थरूर यांची प्रतिक्रिया थोड्याच वेळात सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. एका यूजरने चॅम्पियन्स असणारी टीम एवढे सलग सामने हरू कशी शकते. एवढे खराब प्रदर्शन कसे करू शकते. तर एकाने जास्त बदल आणि फेरबदल संघाचे नुकसान करू शकते, असे लिहिले आहे. मला विश्वास आहे की पुढील वर्ल्डकपमध्ये भारताचे प्रदर्शन चांगले असणार नाही. तर एका युजरने बीसीसीआयवर टीका केली आहे. गौतम गंभीरचा अहंकार आणि बीसीसीआयच्या चुकीच्या विचारसरणीमुळे भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले आहे, असे एका युजरने पोस्टवर म्हटले आहे.
कालच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अपयशी झाल्याचे दिसून आले. तसेच तिलक वर्मा, अक्षर पटेल, अभिषेक शर्मा चांगली खेळी करू शकले नाहीत. भारतीय गोलंदाज देखील पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. केवळ इंग्लंडच्या एकाच फलंदाजाला आउट करण्यात यश आले. कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार अर्धशतक लगावले. 80 रन्सच्या खेळीवर भारताने 158 रन्स केल्या. दरम्यान इंग्लंडने फिलिप सॉल्ट आणि कर्णधार हॅरी ब्रूकने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्या जोरावर इंग्लंडने भारताविरुद्धची मालिका जिंकली आहे.