इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक (फोटो- ians)
काय म्हणाला कर्णधार हॅरी ब्रूक?
भारतासारख्या शक्तिशाली संघाला पराभूत करणे नेहमीच खास असते. कालच्या सामन्यात आम्ही अत्यंत चांगला खेळ केला. खेळाडूंनी पीचचा अंदाज घेतला असल्यामुळे चांगला खेळ केला. आमच्या संघाने विविध परिस्थितीमध्ये आपल्या कौशल्याचा चांगला वापर केला. त्यामुळे यांचा विजय सोपा झाला.
हॅरी ब्रूकने तोंडभरून आपल्या गोलंदाजांचे कौतुक केले. आमच्या खेळाडूंमध्ये, गोलंदाजांमध्ये चांगला संवाद सुरू असतो. त्यामुळे यांचे प्रदर्शन अधिक चांगले होते, असे हॅरी ब्रूकने म्हटले. आमचा संघ शेवटचा सामना देखील जिंकला तर इंग्लंडचा संघ टी 20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्या नंबरवर पोहोचेल. जगातील एक नंबरची टीम होणे आमच्यासाठी गर्वाची बाब असणार आहे. मात्र आमचे लक्ष्य चांगले क्रिकेट खेळण्याकडे आणि सिरिज जिंकण्याकडे आहे.
‘हा अपमान सहन..; Team India चा दारुण परभव होताच भडकले शशी थरूर, ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
कालच्या सामन्यात कर्णधार हॅरी ब्रूकने 35 बॉलमध्ये 79 रन्सची आक्रमक खेळी केली. फलंदाजी करण्याआधी इंग्लंडच्या फलंदाजांनी कोचिंग स्टाफशी विस्तृत चर्चा केली होती, त्याचा फायदा संघाला झाला. इंग्लंडची फलंदाजी ही संघाची ताकद आहे. प्रत्येक परिस्थितीमधून इंग्लंडचे फलंदाज संघाला विजयापर्यंत पोहोचवतातच, असे हॅरी ब्रूक म्हणाला.
ENG vs IND : इंग्लंडने 3-0 ने जिंकली T-20 सीरीज; टीम इंडियाचा मोठा पराभव
ग्लंडने १५९ धावांचे लक्ष्य केवळ १३.५ षटकांत पूर्ण केले, म्हणजेच संघाने ३६ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. १५० पेक्षा जास्त धावा केल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील टीम इंडियाचा हा सर्वात मोठा पराभव आहे. एकूणच, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताला केवळ दोनदाच अधिक चेंडू शिल्लक असताना पराभव पत्करावा लागला आहे. मात्र भारताचा संघ सातत्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत अपयशी ठरताना दिसून येत आहे. सातत्याने केले जाणारे बदल घातक ठरताना दिसत आहेत. त्यामुळे गौतम गंभीर, श्रेयस अय्यर, बीसीसीआयवर चाहते संतापले आहेत. संजू सॅमसनला बाहेर ठेवल्याने देखील क्रिकेटचे चाहते संतापले आहेत.






