
मुंबईत ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’ची घोषणा
DivaTales Events प्रस्तुत ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’चा मुख्य क्रिकेट सामना ऑक्टोबर महिन्यात पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सेलिब्रिटीज, उद्योजक, व्यावसायिक आणि क्रिकेटप्रेमींना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Cricket Breaking: पुण्यात कॉर्पोरेट टी-२० चा थरार! चित्तरंजन रे अन् वैभव लवांडेची आक्रमक फटकेबाजी
CTC ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून क्रिकेट, मनोरंजन आणि बिझनेस नेटवर्किंगचा अनोखा संगम ठरणार आहे. विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती या उपक्रमाशी जोडल्या जाणार असून, सेलिब्रिटीजची उपस्थिती हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहे. या प्रसंगी मुंबई हिरोजचे कर्णधार सुनील शेट्टी, मुंबई हिरोजचे सोहेल खान, CTCच्या ब्रँड ॲम्बेसेडर दीपली साय्यद, ब्रँड आयकॉन सिद्धांत मोरे तसेच CTC आणि DivaTales चे CMD हाफिज बेग यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी Gravity Group चे CMD मीहिर कुलकर्णी, Apli Sakhi च्या संचालिका संगीता तर्डे तसेच Pune Tycoons चे कर्णधार आणि Smita Holidays चे CMD जयंत गोरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाबद्दल उत्साह व्यक्त केला.
क्रिकेटच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्र आणि उद्योगविश्व यांच्यातील संवाद तसेच परस्पर संबंध अधिक दृढ करणे, हा CTCचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेनंतर आता ऑक्टोबरमध्ये पुण्यात होणाऱ्या CTC सामन्याकडे क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्राचे लक्ष लागले आहे. सेलिब्रिटीजचा जलवा, क्रिकेटचा थरार आणि मनोरंजनाची रंगत यामुळे हा क्रिकेट महोत्सव संस्मरणीय ठरण्याची अपेक्षा आहे.