Champion Trophy 2025:...and Hardik Pandya shuts down Pakistani journalist; The player tells the story with a smile
Champion Trophy 2025 : टीम इंडियाने 12 वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. भारताच्या विजयाने सर्व भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सर्व खेळाडू आनंद व्यक्त करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत टीम इंडियाला चॅम्पियन बनवण्यात हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली असून त्याने काही सामन्यांमध्ये बॉलिंगसह आपल्या बॅटने धावाही फटकवाल्या आहेत. आशातच विजेतेपद पटकावल्यानंतर हार्दिक पांड्याने पाकिस्तानच्या पत्रकारांना प्रत्युत्तर दिले आहे. त्याने पत्रकार परिषदेत अनेकांना बरच काही शिकवले आहे. हार्दिक पंड्या म्हणाला की, ‘जिथे आव्हाने मोठी असतात तिथे अधिक मेहनत करण्याची गरज असते. अडचणींना घाबरून घरी जाऊन रडायला लागलो, तर काहीही मिळणार नाही’ असे पंड्या म्हणाला.
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर खेळाडूंनी आनंद साजरा करत आहेत. विजय मिळाल्यानंतर हार्दिक पंड्या पत्रकार परिषदेला सामोरा गेला. त्यावेळी त्याला पहिला प्रश्न विचारला गेला. तेव्हा एका पाकिस्तानी पत्रकाराकडून त्याला प्रश्न विचारण्यात आला. पत्रकार म्हणाला की, ‘ठीक आहे सर, जिंकल्याबद्दल तुमचे अभिनंदन, माझा प्रश्न असा आहे की, भारताने दुबईत ज्या प्रकारे सर्व सामने जिंकले आहेत, त्या प्रत्येक सामन्यात भरपूर प्रेक्षक हजर होते, त्यामुळे पाकिस्तानी लोकांनाही भारताने तिथे येऊन खेळायला हवे होते.
तुमचे तिथेही खूप चाहते आहेत. यावर तुम्ही काय सांगाल?’ यावर हार्दिक पांड्या याने उत्तर देत म्हटले की, ‘हे खूप छान आहे, त्यांनाही ते हवे होते. मात्र, ते होऊ शकले नाही, त्यामुळे मला खात्री आहे की, इथल्या सर्व पाकिस्तानी लोकांनी याचा आनंद घेतला असेल. आता आम्ही पाकिस्तानात का गेला नाही? आणि कुठे गेलो नाही हे बोलणे माझ्या अधिकारात नाही.’
पुढे हार्दिक पांड्या म्हणाला की, जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा त्याला मेहनत करायला खूप मजा येते. तसेच तो म्हणाला की, ‘जर पांड्याने काहीही केले नाही तरी ठीक आहे. मात्र संघाने चांगली कामगिरी केली तर ते चांगले आहे. माझा विश्वास आहे की, आव्हान जर कठीण असेल तर लढत राहा. घरी जाऊन रडण्याने काहीच मिळणार नाही.
हेही वाचा : Champion Trophy 2025 :नागपुरात होळीआधीच ‘विजयी’ रंगांची बरसात; चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘असा’ही एक विजयोत्सव..
पुढे हार्दिक पांड्या म्हटला की की, ‘मी जर चांगली गोलंदाजी करत असेल, तर फलंदाजीत कोणतीही अडचण येत नाही. मी नेहमी सांगत आलो आहे. की जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर इतर कसे ठेवतील? त्यामुळे मी स्वतावर विश्वास ठेवला की मी ते करू शकतो. असे ही पंड्याने सांगितले.