क्रिकेट चाहत्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
Indian Cricket Team: आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसाठी सर्वच क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा शुभारंभ 19 फेब्रुवारीपासून होणार आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत असून यामध्ये आतापर्यंत ५ संघांनी आपले संघ जाहीर केले आहेत. मात्र भारताचा संघ अजूनही जाहीर झालेला नाही . चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या काही सामन्यांमध्ये भारताने निराशाजनक कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ अजून जाहीर झालेला नाही. मात्र संघ जाहीर करण्यासाठी इतका उशीर का ? असा प्रश्न क्रिकेटच्या चाहत्यांना पडत आहे. त्यामागे काय कारण आहे, ते जाणून घेऊयात.
जसप्रीत बुमराह हा भारताचा सर्वात यशस्वी आणि महत्वाचा खेळाडू आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात आलेल्या बॉर्डर-गावस्कर स्पर्धेत भारताने निराशाजनक कामगिरी केली. तसेच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जखमी झाला. सिडनीमधील सामन्यात दुसऱ्या डावामध्ये बुमराह गोलंदाजी करू शकला नव्हता. पाठीच्या दुखापतीमुळे त्याने गोलंदाजी केली नाही. आता बुमराहला एनसीएच्या रिहॅब प्रक्रियेतून जावे लागणार आहे. त्यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे.
जसप्रीत बुमराह जर दुखापतीमुळे चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत खेळू शकला नाही तर, भारतासाठी हा चिंतेचा विषय असणार आहे. कारण जसप्रीत बुमराह हा भारताचा हुकूमी गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराह लवकरच बरा होण्याची शक्यता आहे. कदाचित जसप्रीत बुमराह चॅम्पियन ट्रॉफीसाठी सुरुवातीचे सामने खेळण्याची शक्यता कमी आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वाधिक गोलंदाजी करत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम जसप्रीत बूमराहने केला आहे. सिडनी कसोटीत त्याला दुखापत जाणवू लागली. त्यामुळे त्याला स्कॅनिंगसाठी जावे लागले.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणत्या संघांनी केले स्क्वाड जाहीर?
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसाठी सर्वच क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा शुभारंभ 19 फेब्रुवारीपासून होणार आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत असून यामध्ये आतापर्यंत ५ संघांनी आपले संघ जाहीर केले आहेत. आयसीसीने तात्पुरत्या संघाची घोषणा करण्यासाठी १२ मार्च ही तारीख निश्चित केली होती, परंतु आतापर्यंत ३ संघांनी त्यांचा संघ जाहीर केलेला नाही, ज्यात भारताचा समावेश आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेने आपले संघ जाहीर केले नसून, हे संघही लवकरच आपल्या संघांचे अनावरण करतील अशी अपेक्षा आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या ८ संघांची प्रत्येकी ४ गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेशचा समावेश आहे. तर ब गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान आहेत. यामध्ये काही संघाची संघाची घोषणा केली आहे. यामध्ये कोणत्या संघानी चॅम्पियन ट्रॉफीसाठी संघाची घोषणा केली आहे यावर एकदा नजर टाका.