सौजन्य - सोशल मिडीया
पिंपरी : चिंचवड राज्यासह देशभरात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना दररोज उघडकीस येत आहेत. गुन्हेगारीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. पोलिसही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एका अज्ञात व्यक्तीने ‘मास्क मॅन’च्या रूपाने खळबळ उडवून दिली आहे. चेहऱ्यावर मास्क, आणि हातात धारदार चाकू घेऊन भरदिवसा रस्त्यावर वावरताना मास्क मॅन नागरिकांना दिसला आहे.
हा मास्क मॅन दिवसाढवळ्या पिंपरी चिंचवड येथे हातात चाकू घेऊन फिरताना दिसला. नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी या मास्क मॅनने धारधार चाकू हातात घेतला आहे. भर रस्त्यात , भर दिवसा हातात धारदार चाकू घेऊन मास्क मॅन शहरात वावरताना पाहायला मिळत आहे. निगडी येथील बजाज ऑटोमोबाईल समोरील एचपी पेट्रोल पंपाजवळ मास्क मॅन हातात धारदार चाकू घेऊन रस्ता क्रॉस करत असताना दिसत आहे. त्याने कोणाला मारण्यासाठी हा चाकू हातात घेतला आहे की लोकांना दहशत निर्माण करण्यासाठी हे अद्यापही समोर येऊ शकले नाही.
मास्क मॅन गुन्हेगाराने चेहऱ्यावर मास्क घालून आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हातात धारदार चाकू घेऊन वावरत असल्याने रस्त्या वरून ये जा करणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये मास्क मॅनची मोठी दहशत निर्माण झाली आहे. आता हातात चाकू घेऊन पिंपरी चिंचवड शहरात वावरणाऱ्या मास्क मॅन च्या मुसक्या पिंपरी चिंचवड पोलीस कधी आवळणार. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
‘मानवी सांगाडा’ आढळल्याने खळबळ
येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात गुरुवारी संध्याकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भररस्त्यात, अगदी चौकाच्या मध्यभागी मानवी सांगाड्यासारखी वस्तू आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही वेळासाठी नागरिक आणि पोलीस यांच्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पुण्यातील अहिल्यानगर रस्त्यावरील या चौकात रहदारी सुरु असताना काही नागरिकांच्या नजरेस मानवी सांगाड्यासारखी आकृती पडली. डोके, धड आणि कमरेपर्यंत असलेला हा सांगाडा खऱ्याच मानवी सांगाड्यासारखा दिसत असल्याने भीतीचे वातावरण पसरले. इतकेच नव्हे तर काही चारचाकी वाहने त्याच्यावरून गेलेल्या देखील दिसल्या. नागरिकांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सांगाडा ताब्यात घेतला. प्रथमदर्शनी तो खरा असल्याचा संशय होता, मात्र तपासाअंती हा सांगाडा प्लास्टर ऑफ पॅरिस आणि लोखंडी तारेचा वापर करून बनवलेला असल्याचे निष्पन्न झाले.