फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ : सध्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ सुरु आहे, या स्पर्धेमध्ये भारताचे अनेक दमदार खेळाडूंचे संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये महिला क्रिकेट संघाने दमदार कामगिरी केली आहे. आतापर्यत भारताच्या महिला आणि पुरुष संघाचे ५ राउंड झाले आहेत. यामध्ये भारताच्या पुरुष संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झाल तर मोरोको विरुद्ध झाला होता यामध्ये भारताच्या चारही पुरुष खेळाडूंनी विजय मिळवून कमाल केली होती. तर महिला चेस संघाचा पहिला सामना जमाईका विरुद्ध झाला होता, यामध्ये भारताच्या महिला चेस खेळाडूंनी ३.५ – ०.५ असे गुण मिळाले होते. भारतीय संघाचा दुसरा राउंड पुरुष संघाचा आइसलँड आणि महिलांचा झेक प्रजासत्ताक विरुद्ध झाला. या राउंडमध्ये पुरुष संघाने ४-० आणि महिला संघाने ३.५ – ०.५ असे गुण मिळवले.
तिसऱ्या राउंडमध्ये भारतीय पुरुष संघाचा हंगरेसोबत सामना झाला तर महिला संघाचा स्विझर्लंडविरुद्ध सामना पार पडला. यामध्ये भारताच्या पुरुष संघाने ३.५ आणि महिला संघाने ३-१ असे गुण मिळवले आहेत. चौथा राउंडमध्ये पुरुष संघाची लढत सेरिबिया विरुद्ध झाली तर महिला संघाची लढत फ्रान्सविरुद्ध झाली. पुरुष आणि महिला संघाने अनुक्रमे ३.५ – ०.५ आणि ३.५ – ०.५ असे गुण मिळवले. १५ सप्टेंबर रोजी झालेल्या पाचव्या राउंडमध्ये भारताच्या पुरुष संघाचा सामना अझरबैजान विरुद्ध झाला होता यामध्ये भारतच्या पुरुष संघाने ३-१ गुण मिळवले आहेत. तर महिला संघाचा सामना कझागिस्थान विरुद्ध पार पडला. यामध्ये भारतीय महिला संघाने २.५ – १.५ असे गुण मिळवले आहेत.
हेदेखील वाचा – गौतम गंभीरचा हा रागाचा किस्सा तुम्हाला माहिती आहे का? आकाश चोप्राने केला खुलासा
गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर भारताचे दोन्ही संघ अव्वल स्थानावर आहेत. भारताचा पुरुष संघ १८/२० गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर चीनचा संघ आहे. तिसऱ्या क्रमांकावर व्हिएतनामचा संघ आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे हंगेरी आणि इराणचे संघ आहेत. महिला स्पर्धेच्या गुणतालिकेवर नजर टाकली तर भारताचा संघ १६ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर अर्मेनिया आणि मंगोलिया अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. पोलंड आणि जॉर्जिया हे दोन्ही संघ अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.